Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुकादमाला लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद; पाच लाखांच्या रकमेसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मागील महिन्यात ऊसतोड मुकादमास लूट प्रकरणाचा छडा लावण्यास गुन्हे अन्वेषण शाखेस (CID) यश आले असून, गुन्ह्यातील चारही आरोपींना जेरबंद करत पाच लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ, मोबाईल असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2022 | 02:59 PM
मुकादमाला लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद; पाच लाखांच्या रकमेसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : मागील महिन्यात ऊसतोड मुकादमास लूट प्रकरणाचा छडा लावण्यास गुन्हे अन्वेषण शाखेस (CID) यश आले असून, गुन्ह्यातील चारही आरोपींना जेरबंद करत पाच लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ, मोबाईल असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ऊसतोड कामगार मुकादम संतोष शहादेव बर्डे आणि त्यांचे भाऊ बबन बर्डे हे मोटारसायकलवर पुण्याहून करंजी घाटमार्गे पाथर्डीकडे जात असताना त्यांना स्कॉर्पिओ वाहनातून पाळतीवर असलेल्या चौघांच्या टोळीने करंजी घाटात वाहन आडवे लावून त्यांच्याकडील सात लाखांवर रक्कम लुटली होती. याबाबत मागील महिन्यात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याचा तपास पाथर्डी पोलिसांसह समांतर तपास जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा करत होती.

गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हा गुन्हा पप्पू दराडे उर्फ प्रवीण दिलीप दराडे, अंबादास नारायण नागरे, तात्याबा पोपट दहिफळे, दत्तू बाबा सातपुते यांनी केल्याचे समजले. या सर्वांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून, पुढील तपासासाठी आरोपींना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हा तपास नाशिक परिक्षेत्राचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील सोपान गोरे, मनोहर शेजवळ, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, संतोष लोढे, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, विश्वास बेरड, योगेश सातपुते, सागर ससाणे आदींनी केला.

Web Title: 17 lakhs worth of goods seized along with an amount of five lakhs action by crime branch nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2022 | 02:59 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Ahmednagar Crime

संबंधित बातम्या

शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थिनींशी मुख्याध्यापकाचे अश्लील वर्तन; तक्रारीनंतरही शिक्षण विभाग ‘कोमात’, कारवाई का नाही?
1

शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थिनींशी मुख्याध्यापकाचे अश्लील वर्तन; तक्रारीनंतरही शिक्षण विभाग ‘कोमात’, कारवाई का नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.