Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Illegal Tree Cutting: शेवगाव वृक्षतोड प्रकरण तापले! वनाधिकाऱ्यांचे लाकूडमाफियांशी साटेलोटे? तृप्ती देसाई आक्रमक

Illegal Tree Cutting: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वृक्षतोड प्रकरणावरून आता वातावरण तापले आहे. वनविभागातील अधिकारी आणि लाकूडमाफियांमध्ये साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित भ्रष्ट उपवनसंरक्षकांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 17, 2026 | 04:30 PM
शेवगाव वृक्षतोड प्रकरण तापले! वनाधिकाऱ्यांचे लाकूडमाफियांशी साटेलोटे? तृप्ती देसाई आक्रमक

शेवगाव वृक्षतोड प्रकरण तापले! वनाधिकाऱ्यांचे लाकूडमाफियांशी साटेलोटे? तृप्ती देसाई आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • शेवगाव वृक्षतोड प्रकरण
  • वनविभाग अधिकारी आणि लाकूडमाफियांचे साटेलोटे?
  • तृप्ती देसाईंचा एल्गार
  • भ्रष्ट उपवनसंरक्षकाच्या हकालपट्टीची मागणी
पोपट पिटेकर,अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात हजारो वृक्षांची बेकायदेशीर कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असतानाच, आता या प्रकरणात वनविभागाच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. वनविभागाने केलेली कारवाई ही केवळ धूळफेक ठरली असून, कारवाईनंतर रात्रीच्या अंधारात वखार मालकांनी तोडलेला लाकूडसाठा गायब केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. वनाधिकारी आणि वखार मालकांच्या या साट्यालोट्याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.(Illegal Tree Cutting)

कारवाई केवळ कागदोपत्री

वनविभागाचा देखावा आणि रात्रीच्या अंधारात लाकूड गायब- शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीचा पर्दाफाश झाल्यानंतर प्रशासनावर दबाव वाढला होता. यानंतर वनविभागाने संबंधित ठिकाणी धाड टाकून कारवाई केल्याचा देखावा निर्माण केला. मात्र, ही कारवाई केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, वनविभागाची पाठ फिरताच रात्रीच्या अंधारात वखार मालकांनी जप्त केलेला आणि तोडलेला सर्व लाकूडसाठा परस्पर गायब केला. वनविभागाच्या आशीर्वादाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर लाकूडसाठा गायब होणे अशक्य असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.

Sambhajinagar Statue Work : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कामांना गती; महापौर अॅक्शन मोडवर

तृप्ती देसाई यांचा संताप

उपवनसंरक्षकांच्या हकालपट्टीची मागणी- या संपूर्ण प्रकरणात वनाधिकाऱ्यांचे थेट संगनमत असल्याचा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. पर्यावरणाचा असा ऱ्हास करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कर्तव्यात कसूर करणारे आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेले उपवनसंरक्षक धर्मवीर साल विठ्ठल यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी थेट मागणी देसाई यांनी केली आहे.

थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे धाव घेण्याचा इशारा

प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी वखार मालक आणि भ्रष्ट वनाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नाहीत, तर हे प्रकरण शांत बसणार नाही, असा सज्जड इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. जर दोषी उपवनसंरक्षकांची तात्काळ हकालपट्टी झाली नाही आणि या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली नाही, तर आम्ही थेट राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन या सर्व घोटाळ्याचा पाढा त्यांच्यासमोर वाचू, असे देसाई यांनी ठणकावून सांगितले आहे. या प्रकरणामुळे अहिल्यानगरच्या वनविभागात मोठी खळबळ उडाली असून, आता वनमंत्री या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Mumbai University : सिनेट सदस्य प्रदिप सावंत यांना कारणे दाखवा नोटीस; शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आक्रमक, मुंबई विद्यापीठाला विचारला

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेवगाव वृक्षतोड प्रकरणात कोण आक्रमक झाल्या आहेत?

    Ans: सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शेवगावमधील वृक्षतोड प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • Que: तृप्ती देसाई यांनी वनविभागावर कोणते आरोप केले आहेत?

    Ans: वनविभागातील अधिकारी आणि लाकूडमाफियांमध्ये साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

  • Que: तृप्ती देसाई यांनी कोणती मागणी केली आहे?

    Ans: संबंधित भ्रष्ट उपवनसंरक्षकांची पदावरून हकालपट्टी करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Shevgaon tree felling case trupti desai demands deputy conservator suspension sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Shevgaon
  • trupti desai

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ
1

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.