लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य
यवतमाळ : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून मेहनतीने तयारी करत असलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ‘नीट’चा पेपर चुकल्याच्या नैराश्येतून गळफास घेऊन त्याने जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली. लकी सुनिल चव्हाण (वय १९, रा. महेशनगर, दिग्रस, यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिग्रस शहरात शोककळा पसरली आहे.
NEET (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) ही देशभरातील सर्वसामान्य वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी घेतली जाणारी अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी एक वर्ष वा त्याहून अधिक काळ कठोर परिश्रम घेतले. रविवारी, 5 मे रोजी ही परीक्षा पार पडली. यवतमाळ जिल्ह्यातून एकूण 2858 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. लकी चव्हाण हाही याच विद्यार्थ्यांपैकी एक होता. त्याने ही परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर घरी परतल्यानंतर त्याच्या मनात पेपर बरोबर न गेल्याची चिंता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तो नैराश्येत आला होता. मात्र, तो सतत चिंतेत आणि गप्प राहू लागला.
राहत्या घरी लकीने घराच्या स्लॅबला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांना ही घटना समजली आणि त्यांनी तातडीने त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
3 मुलींसह विवाहितेची आत्महत्या
एका 32 वर्षीय विवाहितेने पोटच्या तीन मुलींसह राहत्या घरात आत्महत्या केल्याची ही घटना भिवंडी शहरातील फेणे गावात घडली. एक मजली चाळीच्या खोलीत ही घटना घडली असून, खळबळजनक बाब म्हणजे आमच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना आढळली आहे.