Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडीच वर्षांच्या चिमुकलीला सोलापुरातून पळवलं; ‘ती’ पोस्ट व्हायरल होताच मोडनिंबमध्ये आणून सोडलं

अक्षताच्या वेळी चिमुरडी वऱ्हाडी मंडळींना रडताना दिसली. तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे, एवढेच सांगत होती. या अडीच वर्षांच्या चिमुकलीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 17, 2025 | 02:32 PM
सोलापुरातून चिमुरडीला पळवले, पैंजण काढून मोडनिंबमध्ये सोडले

सोलापुरातून चिमुरडीला पळवले, पैंजण काढून मोडनिंबमध्ये सोडले

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले. तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडनिंब येथे एका लग्न समारंभात सोडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केली. त्यानंतर अवघ्या सहा तासांत तिचे आई-वडील मोडनिंबमधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले. मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले.

बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्नकार्य शुक्रवारी मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते. अक्षताच्या वेळी चिमुरडी वऱ्हाडी मंडळींना रडताना दिसली. तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे, एवढेच सांगत होती. या अडीच वर्षांच्या चिमुकलीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली.

दरम्यान, संशयित महिलेने चिमुरडीला मोडनिंब येथे माळी यांच्या लग्नकार्यात सोडून दिले. तेव्हा तिच्या कानातील सोन्याची रिंग व पैंजण पायात नव्हते. पोलिस पथकातील कॉन्स्टेबल अजय चव्हाण, सुधाकर माने, अमोल खरटमल, सूरज सोनवलकर यांनी मोडनिंबमधील लग्नस्थळ गाठले. तेथून तिला ताब्यात घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन केले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने व पोलिस निरिक्षक तानाजी दराडे, एपीआय रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सीसीटीव्ही तपासले

पोलिसांनी तत्काळ स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली. तपासात ती लातूर-कल्याण एसटीमधून जात असल्याचे दिसून आले. त्या एसटीचे वाहक संतोष वाघमारे यांना संपर्क साधेपर्यंत बस टेंभुर्णीपर्यंत गेली होती. परंतु, संशयित महिला मोहोळ स्थानकावर उतरल्याचे वाघमारे यांनी सांगितले. पोलिस पथक पाठलागावर होती.

Web Title: 2 years old baby return home after kidnap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • Kidnaped Case
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : जुळे सोलापुरातील होंडा दुचाकी गोडाऊनला भीषण आग; २५ लाखांचे नुकसान, दोन कोटींचा माल वाचला
1

Solapur News : जुळे सोलापुरातील होंडा दुचाकी गोडाऊनला भीषण आग; २५ लाखांचे नुकसान, दोन कोटींचा माल वाचला

मोफत पाच ब्रास वाळूसाठी प्रशासनाची समन्वय बैठक, ग्रामदक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश
2

मोफत पाच ब्रास वाळूसाठी प्रशासनाची समन्वय बैठक, ग्रामदक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश

Solapur News: शाळा, आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा पुरवा, जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्य आक्रमक
3

Solapur News: शाळा, आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा पुरवा, जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्य आक्रमक

Solapur च्या महापौरांचा मोठा निर्णय; PM Modi यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घेतला ‘हा’ निर्णय
4

Solapur च्या महापौरांचा मोठा निर्णय; PM Modi यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.