Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडीसाठी धावणार 24 स्पेशल ट्रेन; गर्दीच्या काळात प्रवाशांची होणार मोठी सोय

सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी दरम्यान ६ गाड्या धावणार आहेत. ०१०२९ विशेष रेल्वे १३, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी सीएसएमटी येथून दुपारी २.३० वाजता निघून पहाटे ४.२० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2026 | 12:01 PM
नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडीसाठी धावणार 24 स्पेशल ट्रेन; गर्दीच्या काळात प्रवाशांची होणार मोठी सोय

नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडीसाठी धावणार 24 स्पेशल ट्रेन; गर्दीच्या काळात प्रवाशांची होणार मोठी सोय

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आपल्यापैकी रेल्वेने प्रवास करणारे अनेकजण असतील. स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिला जाते. त्यातच आता प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी रोड आणि पुणे ते नागपूर दरम्यान २४ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल गाड्यांमुळे नागरिकांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे.

सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी दरम्यान ६ गाड्या धावणार आहेत. ०१०२९ विशेष रेल्वे १३, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी सीएसएमटी येथून दुपारी २.३० वाजता निघून पहाटे ४.२० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. परतीसाठी ०१०३० गाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून दुपारी ३ वाजून ५५ – मिनिटांनी सुटून पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटीला येईल. या गाडीला दादर, ठाणे (फक्त ०१०३० साठी), कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज स्थानकात थांबा दिला आहेच.

हेदेखील वाचा : Free Train in India: भारतात ‘ही’ खास ट्रेन आजही धावते विना तिकीट; प्रवाशांकडून १ रुपयाही घेतला जात नाही, कारण जाणून थक्क व्हाल

सीएसएमटी-नागपूर ०२१३९ सुपरफास्ट स्पेशल ट्रेन १९ फेब्रुवारी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी निघून दुपारी साडे तीन वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकात थांबा दिला आहे.

सीएसएमटी-सावंतवाडी रोड ६ गाड्या

सीएसएमटी-सावंतवाडी रोड सीएसएमटी दरम्यान ६ गाड्या चालविण्यात येणार आहेत. ०११२९ स्पेशल गाडी सीएसएमटीहून १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी निघून त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीकरिता ०११३० गाडी सावंतवाडी रोडवरून १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुटून पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग (फक्त ०११३० साठी) आणि कुडाळ स्थानकात थांबा दिला आहे.

टिळकनगर-नागपूर सुपरफास्ट ट्रेन

एलटीटी ते नागपूर ०१०२१ सुपरफास्ट स्पेशल १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी एलटीटीहून रात्री १२.५५ वाजता निघून दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. परतीकरिता ०१०२२ ट्रेन १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी नागपूरहून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी (फक्त ०१०२२ साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकात थांबा दिला आहे. याशिवाय पुणे-नागपूर दरम्यान ४ ट्रेन चालविण्यात येणार आहे. प्रवासी या गाड्यांचे आरक्षण करु शकतात.

Web Title: 24 special trains will run for nagpur kolhapur sawantwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Special Train

संबंधित बातम्या

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…
1

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…
2

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! तिकीट बुकिंग रखडलं तरी पैसे सुरक्षित; IRCTC ने लाँच केलं खास फीचर
3

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! तिकीट बुकिंग रखडलं तरी पैसे सुरक्षित; IRCTC ने लाँच केलं खास फीचर

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत
4

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.