वर्धा : निसर्ग सेवा समितीद्वारा निर्मित ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल परिसरात शुक्रवार १ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीच्या विळख्यात आयटीआय टेकडी परिसरातील विविध प्रजातींच्या ३००० वृक्षासह ड्रीप जळून खाक झाले. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
[read_also content=”मैत्री कॉम्प्युटरवर रेल्वे पोलिसांचा छापा, रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार केला उघड https://www.navarashtra.com/maharashtra/railway-police-raid-on-maitri-computer-black-market-of-railway-e-tickets-revealed-nraa-263572.html”]
सदर आग अज्ञात समाजकंटक व्यक्तीद्वारा जाणूनबुजून लावली असल्याचा संशय आहे. आग लागल्यानंतर उन्हामुळे काही क्षणातच सगळीकडे पसरली. त्यामुळे अनेक झाडे आगीच्या विळख्यात सापडली. टेकडी व परिसरात पाच वर्षांपूर्वी लावलेली झाडे तसेच ड्रीप जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तसेच, या परिसरात बघण्याकरिता आलेल्या आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील जवळपास १०० मुलांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. वेळेवर अग्निशमन दल पोहोचले नसते तर, परिसरातील १५ ते २० हजार झाडे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.
[read_also content=”मध्यप्रदेशातून अकोल्यात येतात देशी कट्टे, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे १०० खबरी सक्रिय https://www.navarashtra.com/maharashtra/from-madhya-pradesh-come-to-akola-with-desi-cuts-100-reports-of-special-team-of-superintendent-of-police-are-active-nraa-263562.html”]
महामार्गाची निर्मीती करीत असताना हजारो, लाखो झाडांची कतल केली जाते. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. दुसरीकडे पर्यावरणाच संवर्धन करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थाकडून व्रक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे काम केले जाते. लहान रोपटे मोठ्या होण्यासाठी अनेक वर्ष संगोपन करावे लागते. दुसरीकडे काही समाजकंटकाकडून आग लावत पर्यावरणाचा विनाश करण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन पर्यावरणाची खबरदारी घेण्याची गरज आहे.
झाडांची मोठी हानी – मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती, वर्धा
सध्या तापमानामध्ये वाढ झाली असून, या काळात वृक्षांचे संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. टेकडीच्या बाजूला रहिवासी वस्ती असल्याने त्यांनी आपल्या घरामागील कचरा न जाळता त्याची नगर परिषदेद्वारे येणाऱ्या घंटागाडीमध्ये विल्हेवाट लावावी. टेकडीवरील झाडांचे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे.






