बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथील मनुष्यबळ पुरवठ्याच्या कंत्राटात गंभीर अनियमितता असल्याचा आरोप NSUI चे कृष्णा साठे यांनी केला आहे. २०१४ मध्ये ‘ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ (सध्याची ‘स्मार्ट सर्व्हिसेस’) या कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटाची मुदत संपल्यानंतर कोणतीही नवीन निविदा न काढता त्याला तब्बल ९ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. बार्टीच्या २०२५-२६ च्या वार्षिक कृती आराखड्यानुसार या कंत्राटदार कंपनीवर वार्षिक सुमारे ५२ कोटी रुपये खर्च होत असून, १० वर्षांहून अधिक काळ नवीन निविदा प्रक्रियेशिवाय एकाच खाजगी कंपनीला सतत मुदतवाढ देण्याच्या कायदेशीर आधारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.