
आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड (photo Credit- X)
योजनेचे फायदे आणि व्याप्ती
या योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा देण्यात येते. हृदयविकार, कर्करोग, किडनी विकार, अपघात उपचारांसह हजारहून अधिक उपचार पॅकेजेसचा समावेश असल्यामुळे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या कार्डधारकांची संख्या एकूण पात्र लोकसंख्येच्या एक तृतीयांशाहून अधिक असल्याचे चित्र आहे.
विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि शहरी गरीब भागात आयुष्मान कार्डमुळे कॅशलेस उपचारांची उपलब्धता वाढली असून वैयक्तिक आरोग्य खर्चात लक्षणीय घट झाली आहे. सरकारी रुग्णालयांसह मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्येही या कार्डच्या आधारे उपचार शक्य होत असल्याने नागरिकांचा सहभाग वाढत आहे.
१०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्यास असमानता होणार कमी
राज्यातील आयुष्मान कार्ड निर्मितीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्यास आरोग्य सेवांतील असमानता कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व परवडणारी उपचार व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
पात्र लाभार्थ्यांपर्यंत सर्व आरोग्य योजना विशेष नोंदणी मोहिमा, आरोग्य शिबिरे, ग्रामपंचायत स्तरावरील कार्ड निर्मिती, तसेच शहरी भागात मोबाईल युनिट्सद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी म्हटले आहे.
नवीन मानधनाचे दर असे…
है कार्ड तयार करताना प्रत्येक केवायसीसाठी ५ रुपये दिले जात. आता दर वाढवून २० रुपये दिले जात आहेत, तर कार्ड वितरणासाठी ३ रुपयावरून १० रुपये दर करण्यात आला आहे. असे यात एकूण मानधन आता ३० रुपये करण्यात आला आहे.