देवगड : देवगड तहसीलदारांकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिनांक ०९ डिसेंबर २०२३ रोजी संकल्प सैनिक अकादमी, पुणे येथील ३६ मुले पर्यटनासाठी देवगड येथे आली होती. पर्यटनासाठी आलेल्या देवगड पवनचक्कीच्या खालीचे गार्डन बाजूला असलेल्या समुद्रामध्ये एकूण ०६ मुले बुडाली आहेत. यामधील ०५ मुलांना रेसक्यू करण्यात आले आहे.
यामधील पायल बनसोडे, अनिशा पडवळ, प्रेरणा डोंगरे, अंकिता गारटे ही चार मृत पावली आहेत. यापैकी आकाश तुपे या मुलावर ग्रामीण रुग्णालयामध्ये देवगड येथे उपचार सुरू आहेत. यामधील एक मुलाचा अद्याप शोध लागलेला नाहीये. राम डीचोलकरचा पोलीस शोध घेत आहेत. वरील सर्व ०६ मुले ही १८ ते २४ वर्षे या वयोगटातील आहेत. शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
हे पाच जण समुद्रात अंघोळीसाठी गेले असताना ते बुडाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.