डेप्युटी सीईओ स्मिता पाटील चौकशीच्या कचाट्यात
शेखर गोतसुर्वे, सोलापूर : सोलापूर जिल्हयातील ५६ सरपंच ग्रामसेवक कारवाईच्या कचाटयात सापडले आहेत. स्थानिक २८ ग्रामपंचायतीनी १५ व्या वित्त आयोगाचा सन २०२१-२२ सालातील निधी खर्च करण्याची उदासिनता दाखवली आहे. ग्रामपंचायतीना अनुदान वितरण करून देखील शून्य निधी खर्च करण्यात आल्याने सीईओ दिलीप स्वामी यांनी ९ गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा जारी केल्या आहेत. तर ३६ ग्रामपंचायतीकडे अभिलेख वर्गीकरण करण्यासाठी दफ्तर उपलब्द्ध नसल्याची माहीती समोर आली आहे.
याबाबत ग्रामपंचायात विभागाने दिलेल्या माहीती नुसार सन २०२१-२२ सालातील १५ वित्तआयोगाचा दोनशे एकवीस कोटींचा निधी १ हजार २९ ग्रामपंचायतीना वितरण करण्यात आले आहे . मात्र यातील ५०% ग्रामपंचायतीने आदयप निधी खर्च केला नसल्याची बाब निर्देशनास आली आहे. बार्शी,करमाळा ,कुर्डवाडी, मंगळवेढा,उत्तर सोलापूर,पंढरपूर,माढा,मोहोळ, गटविकासअधिकाऱ्यांना सीईओ दिलीप स्वामी यांनी ८ स्पटेंबर रोजी नोटीसाद्वारे जाब विचारला आहे. या नोटीसांवर आदयप पर्यंत गटविकास अधिकाऱ्यांचा खुलासा प्राप्त झाला नसल्याचे ग्रामपंचायात विभागाकडून सांगण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतीनी विकासकामांवर निधी खर्ची पाडण्यास उदासिनता दाखवली आहे .
बार्शी तालूक्यातील चिंचोली,पांढरी,पिंपळगावपान,रुई,श्रीपतपिंपरी, करमाळा: मलवडी,वीट,वडशिवणे,पोंधवडी, माढा: चांदज,परिते,लऊळ,तडवळे, माळशिरस :आनंद नगर ,बांगरडे,मालेवाडी,सोलेवाडी,मंगळवेढा :गणेशवाडी,मारापूर,हिवरगाव,मुंढेवाडी, मोहोळ :आष्टी , पंढरपूर : भंडीशेगाव,नेपतगाव,शेटफळ, सांगोला : आगलाईवाडी , उत्तर सोलापूर : कौठाळी आशी स्थानिक ग्रामपंचायतींचा १५ वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास उदासिनता दाखविण्यात आले आहे.