उजनी धरण 100 टक्के भरणार; वीजनिर्मिती प्रकल्पच केला गेला बंद
पाटण : कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडत आहे. सध्या प्रतिसेकंद ४२ हजार ५८८ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता धरणाचे ६ वक्र दरवाजे ४ फुटाने उघडले. त्यामुळे या धरणातून 16565 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.
पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सुरू असलेला २ हजार १०० असा एकूण १८ हजार ६६५ क्युसेक विसर्ग पूर्वेकडील नदीपात्रात सुरू झाला आहे. कोयना धरण व्यवस्थापनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे साडेतीन फूट उघडले होते. ते गुरुवारी दुपारी बंद करण्यात आले होते. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने शनिवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता धरणाचे ६ वक्र दरवाजे ४ फुटाने उघडून १६ हजार ५६५ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert : पुढील तीन तास महत्वाचे; कोकण, पुण्यासह ‘या’ भागात पाऊस तांडव करणार, सतर्कतेचा इशारा
शनिवारी सकाळी ८ वाजता धरणात ८१.८७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी २३.३८ टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. आजचा व यावर्षी एक जूनपासून पडलेला एकूण पाऊस कोयनानगर १३३ (२७७६), नवजा १८८ (२९८९) तर महाबळेश्वर २२६ (३०१३), असा असून, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाबळेश्वर येथे पावसाने ३ हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे.
कोयना धरण परिसरात वाढला पावसाचा जोर
यापूर्वी, कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडताना दिसून आले. त्यात छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी १६ हजार ३८१ क्युसेक पाण्याची आवक होत होती. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.
हेदेखील वाचा : PCMC News: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस; पवना-मुळशीमधून विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा