Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाराज छगन भुजबळ लागले कामाला; ठाकरेंच्या सरकारमधील ‘या’ निर्णयाच्या बचावासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. दरम्यान, नाराजी विसरुन ते कामाला लागले आहेत. येवला व लासलगावाबाबत अनेक विकास कामांच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 06, 2025 | 02:11 PM
Chhagan Bhujbal calls meeting of OBC community leaders in Mumbai for reservation

Chhagan Bhujbal calls meeting of OBC community leaders in Mumbai for reservation

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये नाराजीचा पूर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे मित्रपक्षातील अनेक नेते नाराज आहेत. अजित पवार गटातील नेते आमदार छगन भुजबळ यांनी कामाला सुरुवात केली आहे. येवल्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसह छगन भुजबळ हे ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी येवला-लासलगाव मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मागणी केली आहे.

काय आहेत मागणी?

अजित पवार गटाचे नेते व येवला-लासलगाव मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की,

  • येवला शिवसृष्टी ४ कोटी ९५ लक्षच्या उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात यावा.
  • येवला शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वाढीव पाणी मागणी १.४० द.ल.घ.मी. करीता येवला नगरपरिषदेने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रस्तावित केलेल्या गोदावरी कालवा-  येसगाव साठवण तलाव उद्भव धरून नवीन येवला शहर पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रके आराखड्याला प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर करण्यात यावा.
  • लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी बांधवांच्या सुविधेच्या दृष्टीने विंचूर व खानगांव नजिक उपबाजारासाठी मौजे सुभाषनगर येथील ८ हेक्टर ६१.५६ आर व मौजे खानगांव नजिक येथील ३.५० हेक्टर ग्रामपंचायतीच्या ताब्यातील जागा शासकीय दराने संपादित करण्याचा महसूल विभागाला प्रस्ताव प्रलंबित आहे. या प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी.
  • येवला शहर आणि लासलगाव पोलीस स्टेशन येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासाची कमतरता असून सदर ठिकाणी निवासाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी.
  • सध्या प्रशासकीय संकुलामध्ये कार्यरत असलेली येवला तालुका पोलीस स्टेशनची इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे अस्तित्वातील इमारतीवर पहिल्या माळ्याचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ९८ लक्षच्या तालुका पोलीस स्टेशन विस्तारीत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरी मिळावी.
  • येवला शहर पोलीस स्टेशनमागील पोलीस कवायत मैदानाला सरंक्षण भिंत बांधण्याबाबत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून कार्यवाही करण्यात यावी.येवला-लासलगाव मतदारसंघातील जनतेच्या हिताची ही कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.</
    आपल्या येवला-लासलगाव मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आपण मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. 📌 येवला शिवसृष्टी ४ कोटी ९५ लक्षच्या उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात यावा.
    📌येवला शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वाढीव… pic.twitter.com/VglOBF5K0q
    — Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 5, 2025

छगन भुजबळ यांनी पत्र लिहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अनेक विषयांवर मी त्यांच्यासोबत चर्चा केली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भारत सरकारला पत्र लिहून अर्थिक मदत घेतली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांच्या कानी घातले आहे. आता जास्त धावपळ होत नाही. मात्र मी नाराज नाही. कांद्यावरचं निर्यात मूल्य, शिवभोजन थाळी योजना अशा अनेक गोष्टींवर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. दोन लाख लोक शिवभोजन थाळी योजनेचा फायदा घेत आहेत, त्यामुळे ती बंद करु नये,” अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती आमदार छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Web Title: 776149chhagan bhujbal letter to cm fadnavis to continue shiv bhojan thali to cancel onion export duty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis News: दिल्लीत मोठी जबाबदारीपासून पक्षातील छुपा विरोधापर्यंत..; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
1

Devendra Fadnavis News: दिल्लीत मोठी जबाबदारीपासून पक्षातील छुपा विरोधापर्यंत..; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

बळीराजाचे पीक गेले वाहून! CM देवेंद्र फडणवीस आणि DCM अजित पवारांनी केली सोलापूर पूरस्थितीची पाहणी
2

बळीराजाचे पीक गेले वाहून! CM देवेंद्र फडणवीस आणि DCM अजित पवारांनी केली सोलापूर पूरस्थितीची पाहणी

रस्ता अन् विकास गेला खड्ड्यात; खड्डेमय रस्त्याचे CM देवेंद्र फडणवीस मार्ग नामांतर, Video Viral
3

रस्ता अन् विकास गेला खड्ड्यात; खड्डेमय रस्त्याचे CM देवेंद्र फडणवीस मार्ग नामांतर, Video Viral

Maharashtra Heavy rains: अतिवृष्टी, पूरस्थिती अन् मृत्यू…:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश
4

Maharashtra Heavy rains: अतिवृष्टी, पूरस्थिती अन् मृत्यू…:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.