
EV साठी ८ नवे चार्जिंग स्टेशन (फोटो सौजन्य - iStock)
नवी मुंबईः नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरकारी खाजगी भागीदारी तत्वावर २४ ईव्हीसीएस कलस्टर म्हणजेच १४३ चार्जिंग पॉइंट्सपैकी सद्यस्थितीत परिमंडळ १ साठी ४ चार्जिंग स्टेशन क्लस्टर तसेच परिमंडळ २ साठी ४ चार्जिंग स्टेशन क्लस्टर असे एकूण ८ चार्जिंग स्टेशन क्लस्टर म्हणजेच ४८ चार्जिंग पॉईंटस उभारण्यात येत आहेत. जागेच्या उपलब्धतेप्रमाणे नियुक्त एजन्सीला ईव्हीसीएस उभारण्याकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांसाठी पहिल्या टप्प्यातील सुविधा उपलब्ध होणार आहे.
इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला चालना देऊन हवेचे प्रदूषण रोखणे, ध्वनी प्रदूषण कमी करणे, ऊर्जा बचत व ग्रीन हाऊस गॅसचा प्रभाव कमी करुन पर्यावरण संतुलनाकरिता इलेक्ट्रीक वाहने २०३० पर्यंत किमान ३०% असावीत या केंद्र शासनाच्या धोरणान्वये उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने इलेक्ट्रीक वाहनांकरिता पुरेशा प्रमाणात चार्जोंग स्टेशन्स उपलब्ध करून देण्याकडे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात आहे.
अशाप्रकारे पर्यावरणपूरक दृष्टिकोन जपत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इलेट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी पहिल्या टण्यात दोन्ही परिमंडळ क्षेत्रात प्रत्येकी ४ अशी एकूण ८ इलेक्ट्रक वाहन सार्वजनिक चार्जीग स्टेशन उभारण्यात येत असून ही बाब नवी मुंबईची ओळख पर्यावरणशील शहर म्हणून होईल.
१५ व्या वित्त आयोगांतर्गत खर्च करण्यात येणार
या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून खासगी एजन्सीज मार्फत चार्जिंग स्टेशन/क्लस्टर स्वखर्चाने उभारणी करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेस रु.४ प्रती किलोव्हॅट इतके उत्पन्न मिळणार आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत शहराना सवा गुणवत्ता सुधारणा घटकाकरिता प्राप्त निधीमधून यासाठी मिलीयन प्लस सिटी गटातील रू. २ कोटी इतका करण्यात येणार आहे.
मोकळी जागा वापरण्यात घ्यावी लागणार सहमती
या अंतर्गत सर्व पब्लिक चार्जिग स्टेशन यावरील जाहीरातीकरीता महानगरपालिकेने संबंधित एजन्सीला विद्युत रोषणाईसहीत मोकळ जागा नेहमी उपलब्ध करुन द्यावयाची आहे. सदर जाहिरातींपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये महानगरपालिकेचाही हिस्सा असणार आहे. शिवाय या जागांवर महानगरपालिका विविध शासकीय योजना उपक्रम यांच्या जाहीराती होडींग्ज प्रदर्शित करू शकतील, पब्लिक चार्जीग स्टेशन क्षेत्राच्या ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध असल्यास महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीने नियुक्त एजन्सी पाकीटबंद खाद्यपदार्थ पाणी इत्यादी विक्रीसाठी किऑक्स उभारु शकतील.
भारतात Tesla पाहिलं वाहिलं Charging Station सुरु करणार, कुठे चार्ज करता येणार तुम्ही EV?
गर्दीच्या आणि सार्वजनिक जागांलगत उभारणार
इलेवट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी किमान ७० चौ. मी. इतकी जागा आवश्यक असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सत्यालगतच्या उपयुक्त जागा अर्थात ले बे, मॉलर, विभाग कार्यालये, महानगरपालिका मुख्यालय, मंगाल कार्यालये, उद्याने, वाहनतळे अशा गर्दीच्या जागांलगत तसेच महानगरापालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार शहरामध्ये १ चौ. कि. मी. ग्रीडचा कलस्टर प्रस्तावित असून त्यामध्ये ६ इलेक्ट्रीक व्हेईकल कींग स्टेशन प्रस्तावित आहेत. सध्या जागेची उपलब्धता लक्षात घेता एका कलस्टरमध्ये ५ ईव्हीसीएस प्रस्तावित आहेत. अशाप्रकारे एकूण २४ ईकीसीएस क्लस्टर म्हाणजेच १४३ चार्जिंग पॉईंट्स उभारण्यात येणार आहेत.