फोटो सौजन्य- iStock
जेएसडब्लू एमजी (JSW MG) मोटर्सतर्फे भारतामध्ये EHub हा युनिफाईड चार्जिंग प्लेटफॉर्म लॉंच करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे ज्यामुळे प्रवासामध्ये गाडी चार्ज करण्यासाठी देशात कुठेही चार्जिंग स्टेशन शोधता येणार आहे. या अॅपद्वारे विना अडथळा पेमेंट केले जाऊ शकते.
इलेक्ट्रीक स्टेशन कळणार त्यासोबतच पेमेंटही करता येणार
भारतामध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे मात्र चार्जिंग स्टेशनची उपलब्धता त्याचप्रमाणात वाढविणे महत्वाचे आहे. अथवा त्याचबरोबर नेमकी चार्जिंगची उपलब्धता कोणत्या ठिकाणी आहे हे वाहनचालकांना कळणे महत्वाचे आहे. याकरिताच भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रीक वाहनांसाठी Ehub अॅप हा खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच गाडी चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या अॅपची गरजही या युनीफाईड अॅपमुळे राहणार नाही. या अॅपद्वारेच वाहनचालक पेमेंट करु शकतो. एमजीच्या या अॅपद्वारे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, अदानी, इवीआरइ, शेल, झेओन चार्जिंग इत्यादी कंपनीच्या इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनचा वापर केला जाऊ शकतो.
एमजी (MG) आणि जिओने विकसित केला इनोव्हेटिव कनेक्टिविटी प्लॅटफॉर्म
एमजी मोटर्स लवकरच एसयुव्ही कारमध्ये इनोव्हेटिव कनेक्टिविटी प्लॅटफॉर्म देणार असून हा प्लॅटफॉर्म कंपनीने जियोसोबत सयुंक्तरित्या बनविला आहे. या प्लेटफॉर्ममुळे ग्राहक कारमध्ये अनेक ओटीटी अॅपचा वापर करु शकतात तसेच अनेक प्रकारच्या गेम प्लेटफॉर्मचाही वापर करु शकतात.
Windsor EV लवकरच होणार लॉन्च
एमजी मोटर्स (MG Motors) नवीन CUV (crossover utility vehicle ) सेगमेंट Windsor EV लाँच करणार आहे. ही कार सप्टेंबर महिन्यात कंपनीकडून लॉन्च केली जाऊ शकते.एमजीने अलीकडेच या वाहनाचा नवीन व्हिडिओ टीझर जारी केला आहे, या टीझरमध्ये कार लेह लडाखमधील अत्यंत कमी तापमानात उंच उतारावरून बर्फाळ पर्वतापर्यंत सहज जाताना दाखवले आहे. या कारची थेट स्पर्धा XUV 400, Nexon EV, सारख्या वाहनांशी होईल.






