Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण विभाग ‘अ‍ॅक्शन मोड’वर; रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी 818 शाळांची झडती

अनेकदा शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थी संख्येची आकडेवारी फुगवून सांगितली जाते. हा ‘आकडेवारीचा खेळ’ थांबवण्यासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन हजेरी घेण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2026 | 02:53 PM
शिक्षण विभाग 'अॅक्शन मोड'वर; रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी 818 शाळांची झडती;

शिक्षण विभाग 'अॅक्शन मोड'वर; रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी 818 शाळांची झडती;

Follow Us
Follow Us:

रत्नागिरी : जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची ‘पटपडताळणी’ मोहिम एकाच वेळी हाती घेण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ८१८ शाळांची तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. विद्यार्थी संख्येचा आकडा फुगवून सांगणाऱ्या शाळांवर नियंत्रण मिळवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

शिक्षण विभागाच्या वतीने ही मोहीम अत्यंत गोपनीय आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. सकाळी ८ ते १२ या वेळेत शिक्षण विभाग, ‘डाएट’चे अधिकारी, समग्र शिक्षण व योजना विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या पथकांनी विविध शाळांना भेटी दिल्या. राज्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे पहिल्या दिवशी माहिती ऑनलाइन भरता आली नाही. त्यामुळे ६५१ शाळांची माहिती ऑफलाइन पद्धतीने नोंदवण्यात आली, तर १६७ शाळांची माहिती संकलित करण्यात आली आहे. मोजणी करून प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याचे छायाचित्रही काढण्यात आले आहे, जेणेकरून पारदर्शकता टिकून राहील.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही तपासणी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून तीन टप्प्यांत होणार आहे. १५ एप्रिल रोजी ९०० शाळा, २२ एप्रिल ९२६ शाळा अशा एकूण २६२६ शाळा तपासल्या जाणार आहेत.

गैरहजर विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे नोंद

अनेकदा शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थी संख्येची आकडेवारी फुगवून सांगितली जाते. हा ‘आकडेवारीचा खेळ’ थांबवण्यासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन हजेरी घेण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. जे विद्यार्थी गैरहजर आढळले आहेत, त्यांची नोंद स्वतंत्रपणे लॉगिनमध्ये करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या पेपरच्या दिवशीच पडताळणी

विशेष म्हणजे, ही पटपडताळणी महत्त्वाच्या विषयांच्या पेपरच्या दिवशीच आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता अकरावी मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांची वार्षिक परीक्षा.

अतिरिक्त कामाचा कर्मचाऱ्यांवर ताण

महाविद्यालयीन स्तरावर २०१३ पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती न झाल्यामुळे राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुशेष निर्माण झाला आहे. परिणामी, सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून, ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. गजानन सानप यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत.

Web Title: 818 schools raided in a single day in ratnagiri district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Maharashtra school
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश
1

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश

Education News: ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! ९ वी-१० वीच्या २० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक मंजूर
2

Education News: ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! ९ वी-१० वीच्या २० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.