Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News: ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! ९ वी-१० वीच्या २० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक मंजूर

राज्यातील अनेक आमदारांकडून स्थानिक भागातील उमेदवारांना शिक्षक भरतीत प्राधान्य देण्याची मागणी केली जात होती. मात्र,'पवित्र' पोर्टलद्वारे राज्यस्तरावर पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने शिक्षकांची निवड केली जात असल्याचे मंत्री भोयर यांनी सांगितले

  • By anuradha sagar
Updated On: Jun 26, 2026 | 05:13 PM
राज्यातील 'त्या' शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात

राज्यातील 'त्या' शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात

Follow Us
Follow Us:
  • कमी पटसंख्येमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे कमी होत होती
  • अधिवेशनात आमदारांनी स्थानिक उमेदवारांना शिक्षक भरतीत प्राधान्य देण्याची मागणी लावून धरली होती.
  • पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार किरण सरनाईक आणि इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर सरकारने ही अधिकृत घोषणा केली.
 

Education News: ग्रामीण आणि दुर्गम भागातील माध्यमिक शाळांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. इयत्ता ९ वी आणि १० वीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या केवळ २० असली तरी त्या शांळांसाठी तीन शिक्षक मंजूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. या निर्णयामुळे कमी पटसंख्येमुळे शिक्षकांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या ग्रामीण शाळांना मोठा आधार मिळणार आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य किरण सरनाईक व इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ. भोयर म्हणाले की, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी २०२५-२६ या संचमान्यता वर्षासाठी विशेष सवलत दिली आहे. त्यानुसार, इयत्ता ९ वी आणि १० वीची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास संबंधित शाळेत तीन शिक्षकांना मान्यता दिली जाणार आहे.

‘माझ्या मुलाला न्याय द्या…’, केतनच्या वडिलांच्या आक्रोशापुढे मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रकरणात उज्वल निकम यांची एंट्री

राज्यातील अनेक आमदारांकडून स्थानिक भागातील उमेदवारांना शिक्षक भरतीत प्राधान्य देण्याची मागणी केली जात होती. मात्र,’पवित्र’ पोर्टलद्वारे राज्यस्तरावर पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने शिक्षकांची निवड केली जात असल्याचे मंत्री भोयर यांनी सांगितले. तसेच. या शासन निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, हा निर्णय शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदींशी सुसंगत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचेही भोयर यांनी नमुद केले.

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन

महत्त्वाचे बदल

पूर्वीचा निकष : १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता ९ वी आणि १० वीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या किमान ४० असणे आवश्यक होते.

नवा निकष : ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेऊन हा निकष शिथिल करण्यात आला असून, आता केवळ २० विद्यार्थ्यांच्या एकत्रित पटसंख्येवरही तीन शिक्षक मंजूर केले जाणार आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची कमतरता कमी होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title: Maharashtra teacher sanchmanyata rules 3 teachers for 20 students rural schools pankaj bhoyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Dr. Pankaj Bhoyar
  • education news
  • Maharashtra school
  • Rural Department

संबंधित बातम्या

Mumbai News: ‘पार्टीसीपेट मुंबई’च्या माध्यमातून शाळांचा कायापालट! सीएसआर निधीतून महापालिकेची कोट्यवधींची बचत
1

Mumbai News: ‘पार्टीसीपेट मुंबई’च्या माध्यमातून शाळांचा कायापालट! सीएसआर निधीतून महापालिकेची कोट्यवधींची बचत

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
2

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अकोला जिल्ह्यात 15 एक शिक्षकी शाळा; 42 शिक्षक अतिरिक्त, समायोजनाची अद्यापही प्रतीक्षाच
3

अकोला जिल्ह्यात 15 एक शिक्षकी शाळा; 42 शिक्षक अतिरिक्त, समायोजनाची अद्यापही प्रतीक्षाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.