Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडमध्ये 8745 कुटुंबांचे ‘घरकुल’ स्वप्न होणार पूर्ण; ‘पीएम’ आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू

महापालिकेच्या वतीने रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. याव्यतिरिक्त किवळे आणि डुडुळगाव येथील प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2026 | 03:13 PM
देशभरात घरांच्या मागणीत वाढ; जानेवारी ते जूनमध्ये विक्री 1.71 लाख युनिट्सवर

देशभरात घरांच्या मागणीत वाढ; जानेवारी ते जूनमध्ये विक्री 1.71 लाख युनिट्सवर

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महापालिकेकडून सहा नवीन ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे तब्बल ८७४५ कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे. विशेष म्हणजे, या टप्प्यात सदनिकांचे क्षेत्रफळ वाढवण्यात आले असून, उत्पन्न मर्यादेतही शिथिलता देण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. याव्यतिरिक्त किवळे आणि डुडुळगाव येथील प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. ईडब्ल्यूएस (EWS) गट किवळे, रावेत, पुनावळे, वडमुखवाडी आणि मामुर्डी असेल तर एलआयजी (LIG) गट ताथवडे, चोविसावाडी आणि डुडुळगाव असणार आहे.

रावेतच्या प्रकल्पाला पुन्हा गती

पूर्वी न्यायालयात वाद आणि जागा ताब्यात मिळण्यास झालेला उशीर यामुळे रावेत येथील ९३४ सदनिकांचा प्रकल्प रद्द करावा लागला होता. मात्र, आता या प्रकल्पाचा दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून, १००८ सदनिकांच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आले आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल.

उत्पन्न मर्यादा आणि क्षेत्रफळात वाढ

सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेता नियमावलीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवीन सदनिकांचे चटई क्षेत्र (Carpet Area) आता ४८४ चौरस फूट असणार आहे. उत्पन्न मर्यादेतही बदल केला. यात १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी ईडब्ल्यूएस वर्गाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ लाखांवरून ६ लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत पात्र झोपडीधारकांचाही समावेश केल्याने शहरातील हजारो नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेदेखील वाचा : Rupali Chakankar News : भोंदूबाबाचे कारनामे भोवले! महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे आदेश?

कामाची सद्य:स्थिती

आतापर्यंत चार प्रकल्पांतील ३६६८ सदनिकांचे वितरण पूर्ण झाले आहे. डुडुळगाव येथील ११९० सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. उर्वरित ६८०० सदनिकांसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

विविध प्रकल्पांचे काम सुरू

“पंतप्रधान आवास योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे काम सुरू असून, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी येथील ६८०० सदनिकांसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. रावेतच्या प्रकल्पाला मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होईल.”

– हरविंदरसिंह बन्सल, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Web Title: 8745 families in pimpri chinchwad will get home the second phase of the pm awas yojana has begun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Maharashtra Goverment
  • PM Awas Yojana news

संबंधित बातम्या

नवी मुंबईत हरीत क्रांती घडणार; नवी मुंबईच्या पर्यावरण संवर्धनासाठी ‘हरित विभाग स्पर्धा’ जाहीर
1

नवी मुंबईत हरीत क्रांती घडणार; नवी मुंबईच्या पर्यावरण संवर्धनासाठी ‘हरित विभाग स्पर्धा’ जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.