Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माघी गणेशोत्सवानिमित्त कल्याणात साकारणार ७० फूट भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची संकल्पना

  • By Rahul Gupta
Updated On: Feb 07, 2024 | 02:25 PM
माघी गणेशोत्सवानिमित्त कल्याणात साकारणार ७० फूट भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची संकल्पना
Follow Us
Follow Us:

कल्याण : माघी गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून कल्याणात ७० फुटी अतिभव्य अशा श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात हा उपक्रम आयोजित हा करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा माघी गणेशोत्सवाचे 30 वे वर्ष असून अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या माघी गणेशोत्सवामध्ये आपण प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्याची इच्छा अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. त्यानूसार कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात या भव्य मंदिर प्रतीकृतीचे काम सुरू असल्याची माहिती आयोजक आणि आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील त्यांच्या वेळेनुसार याठिकाणी दर्शनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येत अतिशय भव्य दिव्य स्वरूपात प्रभू श्रीराम मंदिराचा सोहळा झाला आणि या मंदिरात प्रभू श्रीराम हे विराजमान झाले आहेत. मात्र या मंदिराचा सोहळा झाल्यापासून दररोज लाखो भक्त याठिकाणी दर्शनासाठी भेट देत आहेत. तर अनेक भक्तांची इच्छा असूनही त्यांना अयोध्येला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या इच्छेनुसार कल्याण पश्चिमेमध्ये पहिल्यांदाच इतकी भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. ही प्रतिकृती 40 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 70 फूट उंच इतकी भव्य असणार आहे. ज्याठिकाणी भक्तांना थेट आतमध्ये प्रवेश करून या मंदिराची रचना पाहता येणार आहे. येत्या 13 फेब्रुवारी रोजी माघी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून पुढील आठवडाभर म्हणजे 19 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना ही प्रतिकृती पाहण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: A 70 feet replica of shri ram temple will be built in kalyan on the occasion of maghi ganeshotsav the concept of kalyan west mla vishwanath bhoir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • kalyan
  • maghi ganeshotsav

संबंधित बातम्या

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
1

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
2

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी
3

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ
4

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.