Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Politics: 11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या

Kalyan Politics: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा निर्णय तब्बल ११ महिने उलटूनही रखडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या विलंबाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2026 | 01:04 PM
11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या

11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या

Follow Us
Follow Us:
  • स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा निर्णय रखडला
  • ठाकरे गट आक्रमक
  • ढोल-ताशांच्या गजरात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन
Kalyan Politics: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महापालिका निवडणुकीला जवळपास 11 महिने उलटूनही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीबाबत निर्णय झालेला नाही. या विलंबाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून, महापालिका मुख्यालयाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात येत आहे. (Kalyan Politics)

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा तिढा कायम

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा विषय प्रलंबित आहे. निवडणुकीला जवळपास ११ महिने उलटून गेले, तरीही या नियुक्त्यांबाबत प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी करत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे.

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ढोल-ताशांच्या गजरात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी ढोल-ताशांच्या गजरात आंदोलन केले. आंदोलनाचा आज (12 नोव्हेंबर 2026) दुसरा दिवस असून, प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करण्यात येत आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा निर्णय घेण्यास आणखी किती वेळ लागणार, असा सवाल आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ आश्वासने न देता प्रशासनाने या विषयावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत महापालिका प्रशासन किंवा संबंधित प्राधिकरणाकडून ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी घेतला आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका कीर्ती ढोणे यांनीही भूमिका मांडली. आता ठाकरे गटाच्या या आंदोलनाची महापालिका प्रशासन कितपत दखल घेते आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोणता निर्णय रखडला आहे?

    Ans: महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा निर्णय जवळपास ११ महिने उलटूनही प्रलंबित आहे.

  • Que: स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी कोणत्या पक्षाने आंदोलन सुरू केले आहे?

    Ans: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे.

  • Que: ठाकरे गटाने आंदोलनादरम्यान कोणता इशारा दिला आहे?

    Ans: स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

Web Title: Kalyan dombivli municipal corporation nominated corporators selection delay thackeray group protest sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Dombivali
  • kalyan
  • KDMC
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर

Kalyan News : हॉर्न वाजवल्याचा राग अनावर; तरुणाला बेदम मारहाण, तक्रार मागे घेण्यासाठी मामालाही चोप
3

Kalyan News : हॉर्न वाजवल्याचा राग अनावर; तरुणाला बेदम मारहाण, तक्रार मागे घेण्यासाठी मामालाही चोप

Kalyan News : दहा तासांच्या संघर्षानंतर अखेर दफनविधी; केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर तणाव निवळला
4

Kalyan News : दहा तासांच्या संघर्षानंतर अखेर दफनविधी; केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर तणाव निवळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.