
पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार
काही दिवसांपूर्वी एका कारचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत शैलेश चव्हाण यांना धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात चव्हाण यांचा जीव सुदैवाने वाचला. संबंधित कारचालकाने इतरांनाही धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी संबंधित कारचालकाला पोलीस ठाण्यात आणले होते. त्यावेळी न्याय मिळण्याच्या अपेक्षेने शैलेश चव्हाण हेही पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तेथे पोलीस अधिकारी अमोल कोंडे यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे तक्रारदारालाच पोलिसांकडून त्रास सहन करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कारचालकाविरोधात केलेली तक्रार आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर बंद करण्यात आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. तसेच पोलीस अधिकारी अमोल कोंडे यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे शैलेश चव्हाण यांच्या मनात स्वतःच्या सुरक्षिततेबाबत भीती निर्माण झाली आहे.
पोलिसांकडूनच काही अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकारी दखल घेणार का आणि संबंधित आरोपांची चौकशी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Ans: बेदरकार कारचालकाविरोधात तक्रार केल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी अमोल कोंडे यांनी धमकी दिल्याचा आरोप शैलेश चव्हाण यांनी केला आहे.
Ans: कारचालकाविरोधातील तक्रार कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद केल्याचा आणि पोलीस अधिकाऱ्याकडून धमकी मिळाल्याचा आरोप त्यांनी वरिष्ठांकडे केला आहे.
Ans: पोलीस अधिकारी अमोल कोंडे यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे सांगितले आहे.