राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ चाळीस हजार होमगार्डंना होणार आहे. त्यांच्या कर्तव्य भत्यांपासून ते भोजन भत्त्यांपर्यंत सर्व भत्यांमध्ये चांगलीच वाढ राज्य शासनाकडून करण्यात आली आहे.
होमगार्डच्या भत्त्यामंध्ये झालेली वाढ
होमगार्डचे कर्तव्य- तुम्ही या संघटनेचे नोंदणी घेतली तर तुम्हाला या संघटनेमार्फत पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन पूर विमोचन तसेच रोगराई, महामारीच्या काळात संपाच्या काळात प्रशासनास मदत कार्य करण्याची कर्तव्य दिले जात असतात.
देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी प्रशिक्षण, आपत्कालीन मदत कार्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.
ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान
राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी दोन हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत. त्यांना मजुरी खर्चाच्या एक टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. दोन हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना एक हजार रूपये व दोन हजार एक दिवसांपेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देण्यात येईल. त्यामुळे राज्य मंत्रीमंंडळाकडून ग्राम रोजगार सेवकांना अशाप्रकारे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.