Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढताना तुटला पिंजरा; बिबट्या फरार

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने बिबट्याला विहीरीतून बाहेर काढले. मात्र या दरम्यान बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वापरला जाणारा लाकडी पिंजरा तुटला. त्यामुळे विहिरीतून बाहेर येताच बिबट्या पुन्हा पसार झाला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2024 | 12:19 PM
फोटो सौजन्य - istock

फोटो सौजन्य - istock

Follow Us
Follow Us:

अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील घनघाव वस्ती येथे एक बिबट्या विहीरीत पडला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने बिबट्याला विहीरीतून बाहेर काढले. मात्र या दरम्यान बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वापरला जाणारा लाकडी पिंजरा तुटला. त्यामुळे विहिरीतून बाहेर येताच बिबट्या पुन्हा पसार झाला. या घटनेमुळे घनघाव वस्ती येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याचा शोध सुरु आहे.

कोपरगाव तालुक्यातील दशरथ वाडीजवळ घनघाव वस्ती येथे रहिवासी गौतम घनघाव यांची विहीर आहे. विहिरीत बिबट्या पडला असल्याचे शनिवारी सकाळी गौतम घनघाव यांना आढळले. त्यांनी याबाबत तात्काळ स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी विहीरीभोवती गर्दी केली होती. विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू होऊ नये, यासाठी स्थानिकांनी विहीरीत दोरीच्या साह्याने बाज टाकली होती. बिबट्या त्या बाजवर चढून बसला. त्यानंतर दुपारच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले. त्यांनी बिबट्याला विहीरीतून बाहेर काढण्यासाठी लाकडाचा पिंजरा आणला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील स्थानिकांच्या मदतीने तो पिंजरा विहीरीत सोडला. त्यानंतर बिबट्याला त्या पिंजऱ्यात पकडून विहीरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र यावेळी अचानक पिंजरा तुटला. विहीरीतून बाहेर येताच बिबट्या गावात पसार झाला.

बिबट्या गावात पसाार झाल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गावात बिबट्याचा शोध सुरु आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी लोखंडी पिंजरा आणण्याऐवजी लाकडी पिंजरा का आणला, असा प्रश्न गाावातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गावातील ग्रामस्थांनी वन विभागाच्या निष्काळजीपणा बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या गावात बिबट्याचा शोध सुरु आहे.

Web Title: A cage broke while pulling out a leopard that had fallen into a well leopard on the run

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2024 | 12:19 PM

Topics:  

  • Ahamadnagar
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.