Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या, निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, एसआरए प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप

प्राधिकरणाकडे असलेल्या नोंदीनुसार किशोरी पेडणेकर या सोसायटीत झोपडीधारक नव्हत्या आणि त्यांना कोणतीही सदनिका वाटप करण्यात आली नव्हती. तरीदेखील पेडणेकर यांनी सदनिकेचा गैरफायदा घेतला असल्याची तक्रार करण्यात आली आहेो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 15, 2023 | 09:00 AM
किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या, निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, एसआरए प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या मागच्या अडचणी सुटण्याचं काही नाव नाही घेत नाही आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी वरळी येथील गोमाता इमारत ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत फसवणूक केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर केला  होता. आता या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात (Nirmal Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट याबद्दल माहिती दिली.

[read_also content=”भारत-श्रीलंका यांच्यात आज फायनल! लंकेला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी? सामना कुठे व कसा पाहणार… https://www.navarashtra.com/sports/india-and-sri-lanka-today-final-match-india-attempt-to-give-a-clean-sweep-to-lanka-these-players-will-get-a-chance-where-and-how-to-watch-the-match-361766.html”]

किशोरी पेडणेकरांवर काय आरोप?

वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा अतंर्गत गोमाता इमारत ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधण्यात आली आहे. 2008 मध्ये पात्र झोपडधारकांना या इमारतीमधील घरांचा वाटप करण्यात आलं. मात्र, यावेळी या योजनेत किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीररित्या या इमारतीमधील सदनिका बळकावल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी पेडणेकर या सोसायटीत झोपडीधारक नाही आणि त्यांना कोणतीही सदनिका वाटप करण्यात आली नव्हती. अशी प्राधिकरणाकडे नोंद होती. त्यामुळे पेडणेकर यांनी सदनिकेचा गैरफायदा घेतला असल्याचा आरोप करण्यात आला.  झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात सहकारी अधिकारी असलेले उदय पिंगळे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत महापालिका आणि एसआरए प्राधिकरणाने घर आणि कार्यालय सील केले होते. या कारवाईनंतर किशोरी पेडणेकर यांनी आपला या सदनिकांशी संबंध नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह शैला प्रशांत गवस, प्रशांत गवस, गिरीश रेवणकर, साईप्रसाद पेडणेकर आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरीट सोमय्या यांनी केला होता आरोप

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सातत्याने किशोरी पेडणेकर यांच्या सदनिका बळकावणे आणि फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. एसआरए प्रकरणी आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे चौकशी झाली नसल्याचा आरोप सोमय्या यांनी मागील वर्षी केला होता. त्याशिवाय, किशोरी पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर आणि त्यांची कंपनी किश कॉर्पोरेटने खोटी दस्ताऐवजे सादर केली असून फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला कोविड काळात नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यात आले होते, असा आरोपही सोमय्यांनी केला होता

Web Title: A case was filed in nirmalnagar police station against kishori pednekars problem nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2023 | 08:48 AM

Topics:  

  • Kishori Pednekar
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

शिवसेनेत कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त; कोणाचं ऐकायचं पडला प्रश्न
1

शिवसेनेत कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त; कोणाचं ऐकायचं पडला प्रश्न

लाडक्या बहिणींसाठी शिवसेनेकडून महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन, विधानसभेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्या गटासाठी स्पर्धा
2

लाडक्या बहिणींसाठी शिवसेनेकडून महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन, विधानसभेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्या गटासाठी स्पर्धा

शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एन. सी यांची नियुक्ती, संजय मोरे यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक जारी
3

शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एन. सी यांची नियुक्ती, संजय मोरे यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक जारी

Prithviraj Chavan News:  पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात शिंदेसेना आक्रमक; दादरमध्ये पोलिसांनी अडवला मोर्चा
4

Prithviraj Chavan News: पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात शिंदेसेना आक्रमक; दादरमध्ये पोलिसांनी अडवला मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.