Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Torrent Power: टोरंटसाठी सरकारच्या पायघड्या? सायडोंगरात जमीन सर्वेक्षण सुरू होताच ठाकरे गट आक्रमक!

Torrent Power: सायडोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या वीजवाहिनीच्या कामासाठी जमीन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, या सर्वेक्षणाला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र विरोध केला आहे. सर्वेक्षणासाठी आलेल्या वीजवाहिनीच्या कामगारांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत माघारी पाठवले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 10, 2026 | 02:34 PM
टोरंटसाठी सरकारच्या पायघड्या? सायडोंगरात जमीन सर्वेक्षण सुरू होताच ठाकरे गट आक्रमक!

टोरंटसाठी सरकारच्या पायघड्या? सायडोंगरात जमीन सर्वेक्षण सुरू होताच ठाकरे गट आक्रमक!

Follow Us
Follow Us:
  • टोरंटसाठी सरकारच्या पायघड्या
  • सायडोंगरात सुरू झाले जमीन सर्वेक्षण
  • ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आक्रमक
  • वीजवाहिनीच्या कामगारांना ठाकरे गटाने परत पाठवले
संतोष पेरणे, कर्जत: टोरंट कंपनी कडून अजूनही कुरापत्या सुरूच असून एवढे मोठे आंदोलन उभे राहिल्यानंतर देखील जमिनीचे सर्वेक्षण सुरू करण्याची हिंमत सरकार दाखवत आहे.धरण परिसरात जंगल तोडलेल्या ठिकाणी जमिनीचे सीमांकन करण्यासाठी काही सर्वेक्षण करणारे कर्मचारी पोहचले असता त्यांना पिटाळून लावण्याचे काम स्थानिक आणि शिवसैनिक यांनी केले. दरम्यान, सरकार कडून जमीन सर्वेक्षण करण्याचे निमित्ताने प्रोत्साहन देण्याचे काम सुरू असून शिवसेना ठाकरे पक्षाने येथे आपण कोणालाही येऊ देणार नाही असा सज्जड दम भरला आहे. (Torrent Power)

पाली सायडोंगर परिसरात वृक्षतोड सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.सरकारवर चोहोबाजूंनी विरोध केला जात असून पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून राज्यातील सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष या आंदोलनात उतरले आहेत.त्यामुळे या प्रकल्पाबाबत आता सरकार नरमाईची भूमिका घेईल असे बोलले जात आहे,पण टोरंट पॉवर कंपनी साठी पायघड्या घालण्याचे काम सरकारने सुरूच ठेवले आहे.

Torrent Project: ‘टोरंट प्रकल्प आम्हाला नको, राज्यात कुठेही न्या’; आरपीआय आठवले गटाचा विरोध

धरण परिसरातील जमीन आणि येथील वीज प्रकल्पात तयार होणारी वीज राज्यभर पोहचवण्यासाठी ट्रान्समिशन लाइन फिरवली जाणार आहे. या जमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत.कर्जत सर्वेक्षणासाठी आलेले कामगार जमीन मोजणीची कामे करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती स्थानिकांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांच्या कानावर घातली.दळवी यांनी तत्काळ सायडोंगर गाठून जमीन सर्वेक्षण साठी आलेल्या कामगारांना तेथून पिटाळून लावले.

सायडोंगर परिसरात सर्वेक्षणाचा प्रयत्न करणारे संबंधित कामगाराने आपले नाव बबलू अहिरवार (मध्य प्रदेश) असल्याचे सांगितले. दिल्लीतील एका कंपनीच्या माध्यमातून हायटेन्शन वीजवाहिनीच्या सर्वेक्षणासाठी आले होते. यावेळी बाजीराव दळवी यांच्यासह अन्य शिवसैनिक यांनी त्यांना सुनावले आणि तेथून पिटाळून लावले. वृक्षतोडीविरोधात पाठिंबा कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर या जंगलाच्या संरक्षणासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत. तीन हजार मेगावॉट क्षमतेचा टोरंट पॉवरचा पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प असून, त्यासाठी सुमारे ३७० हेक्टर क्षेत्राची आवश्यकता आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस वन विभागाकडून वृक्षतोड थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र,जमीन सर्वेक्षणाचा प्रयत्न झाल्याच्या घटनेमुळे ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत.

जंगलात वन कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमलेले आहेत. त्यांच्या निदर्शनास सर्व्हसाठी आलेले असे कुणी आढळले नाहीत. कदाचित ते जंगलापर्यंत पोहोचले नसतील आणि त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसले नाहीत, अशी माहिती कर्जत पूर्व विभाग वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी दिली.

सायडोंगर परिसराची पाहणी करून परतत असताना दोन कर्मचारी सर्वेक्षणाचे साहित्य घेऊन जाताना दिसले. चौकशी केली असता या भागातून हायटेन्शन वीजवाहिनी जाणार असून, त्यासाठी सर्वेक्षण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या परिसरातील वृक्षतोड थांबवण्यात आली असून, प्रकल्पाबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही त्यांना सर्वेक्षण करण्यास मज्जाव केला, अशी माहिती तालुका प्रमुख शिवसेना ठाकरे पक्ष बाजीराव दळवी यांनी दिली.

Manoj Jarange Patil: टोरंट प्रकल्पावरून सरकारला इशारा; ‘सह्याद्री उद्ध्वस्त करण्याचा घाट थांबवा’, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: सायडोंगरात कोणत्या कामासाठी जमीन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे?

    Ans: सायडोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या वीजवाहिनीच्या कामासाठी जमीन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

  • Que: टोरंटच्या कामाला कोण विरोध करत आहे?

    Ans: ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या कामाला विरोध दर्शवला आहे.

  • Que: ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नेमकी काय भूमिका घेतली?

    Ans: सर्वेक्षणासाठी आलेल्या वीजवाहिनीच्या कामगारांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत माघारी पाठवले.

Web Title: Torrent power land survey begins at saidongar thackeray group protest sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Shiv Sena
  • UBT

संबंधित बातम्या

Anand Paranjpe: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी शिवसेनेचा दिवाळीचा गोडवा! राज्यात ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधांचे वितरण
1

Anand Paranjpe: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी शिवसेनेचा दिवाळीचा गोडवा! राज्यात ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधांचे वितरण

Metro Line 5: कल्याणनंतर आता उल्हासनगरलाही मेट्रो कनेक्टिव्हिटी; मेट्रो ५ चा विस्तार शांतीनगरपर्यंत, श्रीकांत शिंदेंनी दिली माहिती
2

Metro Line 5: कल्याणनंतर आता उल्हासनगरलाही मेट्रो कनेक्टिव्हिटी; मेट्रो ५ चा विस्तार शांतीनगरपर्यंत, श्रीकांत शिंदेंनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.