Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

Mumbai News : मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रेल्वे प्रशासनासह राज्य सरकारला धारेवर धरले.

  • By विवेक
Updated On: Nov 12, 2026 | 03:07 PM
Kishori Pednekar

Kishori Pednekar

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी
  • रेल्वे प्रशासनावर किशोरी पेडणेकरांचा संताप
  • रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित
 

मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याने नवा वाद पेटला आहे. या प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेल्वे प्रशासनासह राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. ‘उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्राची गाणी वाजवली जातील का?’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे मराठी भाषा आणि स्थानिक संस्कृतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Mumbai News)

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठ्या आवाजात भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला. विशेष म्हणजे, प्रवाशांसाठी महत्त्वाच्या रेल्वे उद्घोषणा आणि वेळापत्रकाच्या सूचना बाजूला ठेवून गाणी वाजवली जात असतील, तर हा नेमका कोणता कारभार आहे, असा सवालही त्यांनी केला.

‘आमचा गाण्यांना विरोध नाही. मात्र, ज्या ठिकाणी जी स्थानिक भाषा आणि संस्कृती आहे, तिचा मान राखला गेला पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात मराठीला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

छठपूजेला विरोध नाही, कृत्रिम तलाव उभारा!

छठपूजेच्या श्रद्धेबाबत बोलताना पेडणेकर यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. छठपूजा पाण्याजवळ केली जाते आणि भाविकांच्या श्रद्धेचा आम्हाला आदर आहे, असं त्या म्हणाल्या. गणेशोत्सवासाठी जसे कृत्रिम तलाव तयार केले जातात, तसेच छठपूजेसाठीही संबंधित वस्त्यांमध्ये कृत्रिम तलाव तयार करावेत, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामुळे मुंबईच्या दैनंदिन जनजीवनावर परिणाम होता कामा नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मराठी माणसाच्या हक्कांवरून सरकारला घेरलं

केवळ भोजपुरी गाण्यांचाच मुद्दा नाही, तर रेल्वे प्रशासनाचा एकूण कारभारच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. रेल्वे सेवा बंद राहणे, प्रवाशांना पूर्वसूचना न मिळणे आणि अपुऱ्या सुरक्षेमुळे होणाऱ्या घटनांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांना मैदाने उपलब्ध होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कोकणी जत्रेसारख्या कार्यक्रमांना जागा मिळत नसेल, तर मराठी माणसाच्या हक्कांचं काय, असा सवाल त्यांनी केला.

नायगाव रेल्वे स्थानकातील तरुणीच्या छेडछाडीच्या घटनेवरूनही त्यांनी गृहखात्याला लक्ष्य केलं. महिलांच्या सुरक्षेबाबत केवळ आश्वासनं नकोत, तर ठोस कारवाई हवी, अशी मागणी त्यांनी केली. एकूणच, भोजपुरी गाण्यांवरून सुरू झालेला हा वाद आता मराठी अस्मिता, रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारच्या कारभारापर्यंत पोहोचला आहे.

Kalyan Politics: 11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी का वाजवली जात आहेत?

    Ans: छठपूजेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याचा मुद्दा समोर आला आहे. यावरून स्थानिक भाषा आणि संस्कृतीच्या प्राधान्याबाबत वाद निर्माण झाला आहे.

  • Que: किशोरी पेडणेकर यांनी भोजपुरी गाण्यांवर काय आक्षेप घेतला?

    Ans: रेल्वे स्थानकांवर मोठ्या आवाजात भोजपुरी गाणी वाजवण्याऐवजी स्थानिक मराठी भाषा आणि संस्कृतीला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका किशोरी पेडणेकर यांनी मांडली. तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये महाराष्ट्राची गाणी वाजवली जातील का, असा सवाल केला.

  • Que: किशोरी पेडणेकर यांनी छठपूजेसाठी कोणती मागणी केली?

    Ans: गणेशोत्सवाप्रमाणे छठपूजेसाठीही संबंधित वस्त्यांमध्ये कृत्रिम तलाव तयार करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. छठपूजेच्या श्रद्धेला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mumbai news mumbai railway stations bhojpuri songs kishori pednekar protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Chhath Puja
  • Kishori Pednekar
  • Mumbai Local
  • Mumbai News
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Chhath Puja 2026: छठ पूजेत बांबूच्या सूप आणि दौऱ्याचेच महत्त्व का? पितळ आणि स्टीलच्या भांड्यांबाबत जाणून घ्या धार्मिक श्रद्धा
1

Chhath Puja 2026: छठ पूजेत बांबूच्या सूप आणि दौऱ्याचेच महत्त्व का? पितळ आणि स्टीलच्या भांड्यांबाबत जाणून घ्या धार्मिक श्रद्धा

Chhath Puja: ‘…त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो’; पिंपरी घाटावरील ‘त्या’ प्रकरणात विजय गुप्ता काय म्हणाले?
2

Chhath Puja: ‘…त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो’; पिंपरी घाटावरील ‘त्या’ प्रकरणात विजय गुप्ता काय म्हणाले?

Kirit Somaiya: ‘MHADA च्या 110 फ्लॅट्सवर घुसखोर बांग्लादेशींचा कब्जा…’, किरीट सोमैयांचा ‘लँड जिहाद’ आरोप, काय आहे प्रकरण
3

Kirit Somaiya: ‘MHADA च्या 110 फ्लॅट्सवर घुसखोर बांग्लादेशींचा कब्जा…’, किरीट सोमैयांचा ‘लँड जिहाद’ आरोप, काय आहे प्रकरण

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL
4

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.