Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पसरणी घाटात दरड कोसळली ; वाई पाचगणी रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा

  • By Aparna
Updated On: Sep 29, 2023 | 05:46 PM
पसरणी घाटात दरड कोसळली ; वाई पाचगणी रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा
Follow Us
Close
Follow Us:

वाई : वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात बुधवारी दुपारी दरड कोसळली. यामुळे पाचगणी महाबळेश्वरकडे  जाणारी येणारी वाहतूक ठप्प झाली. पसरणी घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू केले. सायंकाळ पर्यंत दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे उप अभियंता महेश गोंजारी यांनी सांगितले. घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाई पोलीस दाखल झाले होते.

वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात बुधवारी दुपारी दत्त मंदिराच्या पुढे वाईहुन पाचगणीला जाण्याच्या मार्गावर रस्त्यावर भली मोठी दरड कोसळली. यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली.पाचगणी व वाईकडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. मागील काही दिवसांपासून परिसरात हलका व मध्यम पाऊस सुरु आहे. सकाळपासून जिल्ह्यात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. दुपार नंतर पावसाने विश्रांती घेतली. सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगरावरील माती सैल झाल्याने छोटे मोठे दगड आणि माती निसरडे झाले आहेत. त्यातून या मार्गावर दरड कोसळली. मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या वतीने दरड हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सायंकाळपर्यंत दरड हटविण्यात आली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.

 अहवाल लवकरच प्राप्त होईल
दरवर्षी वाई पाचगणी महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस पडत असतो. मुसळधार पावसात दरडी कोसळतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील आयआयटीच्या अभियंत्यांकडून दरड कोसळू नये, यासाठी उपाययोजना सुचविण्यास सांगितले आहे. दि १६ सप्टेंबर रोजी या अभियंत्यांकडून पाहणी करण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल लवकरच प्राप्त होईल व पुढील कार्यवाही सुरु होईल, असे उपअभियंता महेश गोजारी यांनी सांगितले.

Web Title: A crack fell in prasrani ghat huge queues of vehicles on y panchgani road nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2023 | 05:46 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pachgani
  • Wai

संबंधित बातम्या

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार
1

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक
2

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
3

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका
4

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.