Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्टोन्मेंट महापालिकेत? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज निर्णय होण्याची शक्यता

महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असतानाच शहरातील पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील नागरी परिसर महापालिकेत विलीनीकरण करण्याच्या कामाला गती दिली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 10, 2025 | 12:56 PM
कॅन्टोन्मेंट महापालिकेत? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज निर्णय होण्याची शक्यता

कॅन्टोन्मेंट महापालिकेत? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज निर्णय होण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

पुणे ; महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असतानाच शहरातील पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील नागरी परिसर महापालिकेत विलीनीकरण करण्याच्या कामाला गती दिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (आज) मुंबईमध्ये कॅन्टोन्मेंटच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक होत आहे. या बैठकीमध्ये कॅन्टोन्मेंटच्या विलीनीकरणाबाबत ठोस निर्णय होणार का? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.

पुणे, खडकी कॅन्टोन्मेंटसह राज्यातील अन्य कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसर संबंधित कॅन्टोन्मेंटजवळील स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीनीकरण करण्यासंदर्भात मागील चार ते पाच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मागील वर्षी राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला यासंदर्भात कॅन्टोन्मेंट प्रशासनासमवेत बैठक घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितला होता. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने डिसेंबर महिन्यात पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात बैठक घेऊन लोकसंख्या, मिळकती, कर्मचारी, त्यांचे वेतन, निवृत्तिवेतन यासह आर्थिक बाबींवर चर्चा केली होती. महापालिकेने यासंदर्भात आपली भूमिका राज्य शासनास अहवालाद्वारे कळविलेली आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून यासंदर्भात केंद्र सरकार व संरक्षण विभागासमवेत चर्चा सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणूक घेण्यासंदर्भातील आदेश दिल्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंट विलीनीकरणाबाबत आढावा घेण्यात आला होता. येत्या काही महिन्यातच महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने राज्य सरकारने त्यादृष्टीने कॅन्टोन्मेंटच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आणला आहे. यासंदर्भातच गुरुवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे कॅन्टोन्मेंट विलीनीकरण करण्याबाबत राज्य सरकारची ठोस भूमिका घेणार का? महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलीनीकरण होणार का? असे प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

राज्य व केंद्राच्या अंतिम चर्चेनंतरच निर्णय शक्‍य

कॅन्टोन्मेंटचे विलीनीकरण झाल्यास लष्करी परिसर वगळून उर्वरित नागरी भाग महापालिकेत येऊ शकणार आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ३६२, तर खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये ३४५ कर्मचारी कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या सेवेत ६० व्या वर्षी सेवानिवृत्ती आहे, त्यानुसार त्यांचे वेतन, वेतन आयोग वेगळे आहेत. तर महापालिकेत ५८ व्या वर्षी सेवानिवृत्ती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा समावेश, लष्करासाठी कोणते रस्ते महत्त्वाचे आहेत, भूसंपादनाच्या प्रकरणांचे काय करायचे? तसेच अति संरक्षित असलेल्या भागातील सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा, पथ दिवे या स्वरूपाच्या प्रश्‍नांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

हे सुद्धा वाचा : गुंडगिरी करणाऱ्या संजय गायकवाडांवर कारवाई करा, पक्ष का पाठीशी घालतो? काँग्रेसचा सवाल

प्रभाग रचनेतही बदल होणार ?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलीनीकरणाबाबतचा ठोस निर्णय गुरुवारच्या बैठकीत होऊ शकतो. त्यासंदर्भातील निर्णय प्रक्रियेला यापूर्वीच वेग देण्यात आला आहे. त्यामुळे आता विलीनीकरणाची घोषणा झाल्यास निवडणुकीवर त्याचा प्रभाव पडणार आहे. त्याचबरोबर प्रभाग रचनेतही बदल होण्याची शक्‍यता आहे. भवानी पेठ आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: A decision is likely to be taken to include the area in the cantonment in the pune municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
2

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.