Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीसह पूरग्रस्तांसाठी 985 कोटींचा निधी केला जातोय वितरीत; शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होतीये जमा

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतीच्या नुकसानीसंदर्भातील मदतीचे वाटप सुरू झाले आहे. नागपूर विभागात कृषी पिकांच्या नुकसानी संदर्भात मदत जाहीर करण्यात आली असून, यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2025 | 09:08 AM
अतिवृष्टीसह पूरग्रस्तांसाठी 985 कोटींचा निधी केला जातोय वितरीत; शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होतीये जमा

अतिवृष्टीसह पूरग्रस्तांसाठी 985 कोटींचा निधी केला जातोय वितरीत; शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होतीये जमा

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमीन, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, वैयक्तिक नुकसान तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत नागपूर विभागात झालेल्या नुकसानीपोटी 474 कोटी रुपये आणि इतर असे सर्व मिळून 985 कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली.

येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर बाबीकरिता ५१० कोटी रुपयांचाही यामध्ये समावेश आहे. ही एकप्रकारची विशेष मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जात आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर विभागातील शेतीचे तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विभागात जून ते सप्टेंबर २०२५ पर्यंत कृषी पिकांच्या नुकसानीसंदर्भात ४७४ कोटी ७८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

हेदेखील वाचा : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी मोठी मदत! २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास शासनाची मान्यता

दरम्यान, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतीच्या नुकसानीसंदर्भातील मदतीचे वाटप सुरू झाले आहे. नागपूर विभागात कृषी पिकांच्या नुकसानी संदर्भात मदत जाहीर करण्यात आली असून, यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांची मागणी

राज्यात मुसळधार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, पुरेशा मदतीअभावी बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर न केल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठत आहे.

राज्य सरकारकडून २५४० कोटींचा निधी

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याला तातडीने मदत देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यानुसार राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी २५४० कोटी ९० लाख ७९ हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. या बाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.

Web Title: A fund of rs 985 crore is being distributed for flood victims due to heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 09:08 AM

Topics:  

  • Rain in Maharashtra

संबंधित बातम्या

ऐन नोव्हेंबरमध्ये सांगली, सोलापूरसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाचा अंदाज; लातूर, बीडमध्ये तर…
1

ऐन नोव्हेंबरमध्ये सांगली, सोलापूरसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाचा अंदाज; लातूर, बीडमध्ये तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.