Nagpur : उड्डाणपूल आणि रस्त्यांचे शहर म्हणून नागपूरने अलीकडच्या काळात नाव कमावले . पण पावसाळ्यात या शहराची झालेली अवस्था बघून कोर्टाने आदेश दिला कि , साचणाऱ्या पाण्यावर कायमचा तोडगा काढा…
रस्ते, उड्डाणपुलाचे शहर एकाच मुसळधार पावसात कुरूप झाले. हा पाऊस २३ सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या पावसाची आठवण करून देत होता. मनपाच्या नालेसफाई, नदी सफाईचीही पोलखोल झाली. विकासकामांचे वाभाडे निघाले.
नागपूरमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावरही झाला आहे. वाहतुकीवर देखील त्याच परिणाम झाल्याचे दिसून आले. वाहतुकीचा वेग मंदावला असल्याचे दिसून आले.
वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५०.४ मिमी पावसाची नोंद झाली. आष्टी तालुक्यात सर्वाधिक ७९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दक्षिण गडचिरोलीत बुधवारी रात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार बॅटिंग केली.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतीच्या नुकसानीसंदर्भातील मदतीचे वाटप सुरू झाले आहे. नागपूर विभागात कृषी पिकांच्या नुकसानी संदर्भात मदत जाहीर करण्यात आली असून, यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
कामठी शहरातील रामनगर रेल्वे क्रॉसिंगवर बांधलेला नवीन उड्डाणपुल मार्ग सुरू होण्यापूर्वीच कोसळला. या मार्गावर वाहतूक अद्याप सुरू झालेली नव्हती. अवघ्या दोन-तीन दिवसांच्या पावसात रस्ता उडून गेला.
2009 मध्ये मान्सून 23 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता आणि यावर्षी तो 24 मे रोजी दाखल झाला. महाराष्ट्रातील काही किनारी भागात 2-3 दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता विभागाने वर्तवली…