Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोरमध्ये भीषण आग, अनेक दुकाने जळून खाक; दुकानदारांचं मोठं नुकसान

भोर- रामबाग मार्गालगत असणाऱ्या न्यू बालाजी सुपर मार्केट किराणा मालाच्या दुकानाला रविवारी (दि. ९) अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 10, 2025 | 03:56 PM
भोरलमध्ये भीषण आग, अनेक दुकाने जळून खाक; दुकानदारांचं मोठं नुकसान

भोरलमध्ये भीषण आग, अनेक दुकाने जळून खाक; दुकानदारांचं मोठं नुकसान

Follow Us
Follow Us:

भोर : भोर- रामबाग मार्गालगत असणाऱ्या न्यू बालाजी सुपर मार्केट किराणा मालाच्या दुकानाला रविवारी (दि. ९) अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यू बालाजी सुपर मार्केटसह शेजारील टिशू पेपर दुकान, हॉटेल, मोबाईल शॉपी दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

न्यू बालाजी सुपर मार्केट किराणा मालाच्या दुकानाला अचानक आग लागून दुकान पूर्णतः भस्मसात झाले असून, आगीने रौद्ररूप धारण केल्याने सुपर मार्केटच्या शेजारील टिशू पेपर दुकान, हॉटेल, मोबाईल शॉपीचेही आगीत मोठे नुकसान झाले आहे. अचानक आग लागल्याचे शेजारील दुकानदाराच्या लक्षात आल्याने दुकानदाराने स्थानिकांना सांगितले. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आग आटोक्यात येत नसल्याने तात्काळ भोर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. स्थानिकांनी आग विझवताना आगीच्या लोटातून तेल डब्बे तसेच शीतपेयाच्या बॉटल्सला आग लागल्याने मोठ -मोठे फटाक्यांसारखे आवाज होऊ लागले, त्यामुळे काही वेळ स्थानिकांना आग विझवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. अग्निशमन दल तसेच भोर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचा प्रयत्न केला. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

या घटनेत सुपर मार्केटचे होलसेल व्यापारी भूषण गावडे (शिरवळ) यांचे ३० लाखाचा किराणामाल तर ३ लाख ५० हजारांची रोकड आगीत भस्मसात झाली. टिशू पेपर दुकानदार सोहम पवार (भोर) यांचे २ लाख, हॉटेल मालक नवनाथ ओंबळे (वाकांबे )१ लाख तर मोबाईल शॉपीच्या निखिल तळेकर (उत्रोली) यांचे ५० हजारांच्या साहित्याचे आगीत जळून नुकसान झाले. भोर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आगीत जळालेल्या दुकानांचा पंचनामा केला. एकीकडे व्यवसाय मंदावले असतानाच अशी घटना घडल्याने तालुक्याच्या सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आगीचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

हे सुद्धा वाचा : Pune Crime : कारचालकाला लुटणाऱ्या दोघांना सापळा रचून पकडले; पुणे पोलीसांची मोठी कारवाई

पुण्यात शाळेच्या बसला भीषण आग

पुण्यात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहरातील खराडी परिसरात गुरुवारी शाळेच्या बसला आग लागली आणि या घटनेत किमान 15 विद्यार्थी होते, विद्यार्थी सुरक्षित बचावले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, तुळजा भवानी नगर परिसरात दुपारी ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, यावेळी विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर त्यांच्या घरी जात होते. चालक शाळेच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना दुपारी 2.45 च्या सुमारास वाहनातून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ बस थांबवली आणि उपस्थित लोकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले. विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर चालकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने संपूर्ण बस जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: A huge fire broke out in bhor and many shops were burnt down nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
4

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.