Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अकोला जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मालोकार यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2025 | 11:39 AM
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी
  • एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
  • विजय मालोकार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. काही नेते पक्षही बदलताना दिसून येत आहे. अशातच आता अकोला जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मालोकार यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली असून, शासनाच्या विविध समित्यांवरही काम केले आहे. यासोबतच शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्क प्रमुख व हिंगोली जिल्ह्यातील नेते डॉ. रमेश शिंदे पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, युवासेना, भाजपा, शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच मोठा पक्ष प्रवेश झाला. त्यांनतर जालना जिल्ह्यात व नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे विविध पक्षातून नेते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात आणखी महत्वाचे नेते लवकरच प्रवेश करणार आहेत.

निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात काँग्रेस

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या विरोधात १ नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केला आहे. मतदार याद्यामधील घोटाळे हा गंभीर व चिंतेचा विषय असून राहुल गांधी यांनी या प्रश्नाला सर्वात आधी वाचा फोडली व पुराव्यासह गडबड घोटाळे उघड केले. निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत ही सर्वांची मागणी आहे. या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून, मोर्चात काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: A leader from eknath shindes shiv sena has joined the congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • Congress
  • Eknath Shinde
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं
1

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ, याद्या दुरुस्त करूनच निवडणुका घ्या; बाळासाहेब थोरातांची मागणी
2

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ, याद्या दुरुस्त करूनच निवडणुका घ्या; बाळासाहेब थोरातांची मागणी

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार
3

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत; थेट बेडरुमध्ये घुसून…
4

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत; थेट बेडरुमध्ये घुसून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.