तरुणीला व्हिडिओ कॉल करत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
इगतपुरी : तुमच्यामध्ये काही वाईट किंवा कमतरता असेल तर अनेक लोक तुमची टिंगलटवाळी करून टोमणे मारतात. यामुळे नाराज होऊन बरेच लोक चुकीचा निर्णय घेतात. असाच प्रकार इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Crime) आडवण येथील एका महिलेसोबत घडला आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे तिच्या घरचे लोक वांझोटी बोलून तिला वारंवार टोमणे मारून मारहाणही करत होते. या प्रकाराला कंटाळून तिने विहिरीत उडी मारत आत्महत्या (Suicide News) करत आपले जीवन संपवले.
सखुबाई जालिंदर डहाळे (वय 28) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. यशवंत नागू नवाळे (रा. खडकेद) यांनी इगतपुरी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, आत्महत्या केलेल्या महिलेचे पती जालिंदर नारायण डहाळे (वय 28), मावस सासू लहानुबाई दमा तातळे (वय 50), नणंद सुगंधा काळू जाखेरे (34), नणंदोई काळू मारुती जाखे (36) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणाचा तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे आणि पोलीस पथक पुढील तपास करत आहे.