Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नागरिकांनी चोप देत गाठलं पोलीस स्थानक

निकृष्ठ दर्जाच्या बुद्धिमतेच्या लोकांच्या त्याचबरोबर त्याच्या वागणुकीमुळे कित्येक अल्पवयीन मुलीच्या आयुष्य खराब होत आहे. आता अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिनी ७ सप्टेंबर रोजी घडली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 08, 2024 | 03:13 PM
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नागरिकांनी चोप देत गाठलं पोलीस स्थानक
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे (अंबरनाथ) : बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता, राज्यामध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर सुद्धा अनेक घटना समोर आल्या होत्या. त्याचबरोबर कोलकतामधील डॉक्टरसोबत झालेल्या निघृण घटनेनंतर राज्यामध्ये संतापाचं वातावरण होत. त्यामुळे सध्या देशामध्ये दूषित वातावरण पसरलेलं आहे. निकृष्ठ दर्जाच्या बुद्धिमतेच्या लोकांच्या त्याचबरोबर त्याच्या वागणुकीमुळे कित्येक अल्पवयीन मुलीच्या आयुष्य खराब होत आहे. आरोपीना कठीणातील कठीण शिक्षा द्यावी अशी नागरिकांची इच्छा आहे. आता अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका नराधमाने अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिनी ७ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हेदेखील वाचा – सलमान खान आणि भाचीच खास नातं! अर्पिता खानच्या मुलीसोबत केली गणरायाची आरती

अंबरनाथ पूर्वेच्या शिवजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने नागरीकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये आरोपीवर विनयभंग सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यामध्ये काही दिवसांमध्ये अनेक धक्कादायक प्रकारे समोर आले आहेत, परंतु राजकीय कार्यकर्त्यांमुळे त्या घटनेच मूळ कारण लपवलं जात आहे. राज्यामध्ये दोन मुलीची अत्यंत निघृण हत्या करण्यात आली होती, काही दिवस या घटनांवर चर्चा झाली त्यानंतर त्या घटनेंकडे आता दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासन सुद्धा त्याला पडद्यामागे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. कल्याणमध्ये एक अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना समोर आली होती, नवी मुंबईमध्ये एका मुलीची हत्या करून दिला टाकले होते. यामधील एकही महिलेवर किंवा मुलीला न्याय देण्यात आला नाही, त्यामुळे मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: A minor girl was molested in ambernath citizens rushed to the police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • Maharashtra Crime
  • thane

संबंधित बातम्या

Dombivali Crime: डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड; कोणी केली हत्या? कारण काय?
1

Dombivali Crime: डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड; कोणी केली हत्या? कारण काय?

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
2

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

MMRDA : डोंबिवली-कल्याणकरांसाठी मोठी खुशखबर! एमएमआरडीएकडून ३६ कोटींची निविदा जाहीर; ठाणे–ठाकुर्ली उन्नत मार्गाला हिरवा कंदील
3

MMRDA : डोंबिवली-कल्याणकरांसाठी मोठी खुशखबर! एमएमआरडीएकडून ३६ कोटींची निविदा जाहीर; ठाणे–ठाकुर्ली उन्नत मार्गाला हिरवा कंदील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.