फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सलमान खान : भारताचा स्टार सलमान नेहमीच्या त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या जीवनामुळे चर्चेत असतो. सलमान खान हा हिंदू सण सुद्धा साजरे करत असतो. सलमान खानची बहीण अर्पिता खान हिने शनिवारी गणरायाचे स्वागत केले. सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी शनिवारी त्यांच्या घरी गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी अर्पिता खानचे संपूर्ण कुटुंब दिसले. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान देखील गणपतीच्या सेलिब्रेशनमध्ये दिसले होते. सोशल मीडियावर आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये सोहेल खानची मुले निर्वाण आणि योहान खानही पोहोचले. सर्वांनी मिळून पूजा केली. यावेळी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये, सलमान खानने भाची आयतसोबत आरती केली. सलमान तपकिरी शर्ट आणि पांढऱ्या पँटमध्ये दिसला. अभिनेता वरुण शर्मा, ऑरी आणि युलिया वंतूर देखील या पूजेचा भाग झाले.
अंबानी कुटुंबाच्या घरी झालेल्या गणेश चतुर्थी सेलिब्रेशनमध्ये सलमान खान दिसला होता.यावेळी सुद्धा सलमान त्याच्या मोठ्या भाचीसोबत सुद्धा पापाराझींसमोर पोझ करताना दिसला. आणखी अनेक बॉलीवूडचे कलाकार सुद्धा अंबानी यांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. यामध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, राजकुमार राव असे अनेक बॉलीवूडचे अभिनेते अभिनेत्री आल्या होत्या.
सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा टायगर ३ मध्ये दिसला होता. या चित्रपटात कतरिना कैफ त्याच्या विरुद्ध भूमिकेत होती . या चित्रपटात शाहरुख खाननेही छोटी भूमिका साकारली होती . या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. याआधी तो कुणाच्या तरी आयुष्यात कुणाचा तरी भाऊ म्हणून दिसला होता. या चित्रपटाची निर्मिती सलमानने केली होती. या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत होती.