मुंबई : मुंबईकरांसाठी गणेशोत्सव (Ganeshotsav) म्हणलं की सगळ्याच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात गणेशोत्सवात लालबागच्या राजाचं ( Lalbaugcha Raja)दर्शन घ्यायला मिळालं की गणेशभक्तांना अत्यानंद होतो. सध्या लालबागच्या राजाचं दर्शनाच्या निमित्ताने एक पत्र चर्चेचा विषय ठरलं आहे. एका महिला भाविकाने हे पत्र लिहिलं आहे. काय आहे त्या पत्रात बघुया.
सामान्य लोकांपासून ते राजकारणी, सेलिब्रेटी लालबागच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती असल्यामुळे अनेक जण त्याचं दर्शन मिळावं म्हणून अनेक तास रांगेत उभे राहतात. दरवर्षी लालबागच्या राजाच्या नवसपेटीमध्ये असंख्य पत्रं येत असतात. यातील एका पत्राने सध्या सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 2019 मध्ये ती तीच्या मुलीसह या नवसाच्या रांगेमध्ये तब्बल आठ तास उभ्या राहिल्या होत्या. या दरम्यान त्या मुलीचा पाय दुखू लागल्याने तीने तिथे असलेल्या सिक्युरिटी गार्डला सांगितले. मात्र, त्याने मायलेकीसोबत वाद घातला त्यामुळे संतापलेल्या मुलगी आईला घेऊन तिथून निघून गेली. आणि त्याच दिवशी त्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
[read_also content=”https://www.navarashtra.com/movies/after-sidhu-moosewala-and-kk-now-another-famous-singer-dies-321546.html सिद्धू मुसेवाला आणि KK नंतर आता आणखी एका प्रसिद्ध गायकाचा मृत्यू “]
दरम्याना याचं पार्श्वभुमीवर त्या महिलेने लालबागच्या राजाला पत्र लिहिलं आहे. 2019 मध्ये लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी आठ तास उभी राहिलो होतो. रांग जराही पुढे न सरकल्याने माझ्या मुलीचे पाय खूप दुखत होते. त्यामुळे माझी मुलगी त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डसोबत बोलायला गेली. तिथे त्याने तिच्या मनाला लागेल असं काहीतरी चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तर दिलं. ते ऐकूनच माझ्या मुलीने मला घेतलं आणि रांगेतून बाहेर निघून दर्शनासाठी न थांबता घरी निघालो. माझ्या मुलीचं मानसिक संतुलन त्या दिवशी बिघडले आणि तिने त्या दिवशी संध्याकाळी गळफास घेऊन स्वतःला संपवले. असा पत्रात उल्लेख केला आहे. तसेच, या पत्रामध्ये त्या मुलीने काढलेले एक चित्रसुद्धा आहे. यामध्ये नवसाचा रांगेत लागलेल्या भाविकांना खुर्च्या देण्यात याव्यात अशी मागणी करताना ती दिसत आहे.