Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Municipal Election 2026: 15 जानेवारीला सार्वजिनिक सुट्टी जाहीर; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १५ जानेवारी ही मतदानाच्या दिवशी संबंधित भागात सार्वजनिक सुट्टी असेल. ही सुट्टी सरकारच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये (२४ सार्वजनिक सुट्ट्या) नव्हती,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 13, 2026 | 01:08 PM
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक
  • १५ जानेवारी ही मतदानाच्या दिवशी संबंधित भागात सार्वजनिक सुट्टी
  • अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची विशेष सशुल्क सवलत
Maharashtra Municipal Election 2026:  राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनिमित्त काही महत्त्वाच्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या निवडणूकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आल्याचा शासन निर्णय उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केली आहे.

Municipal Election 2026: १५ जानेवारीला मतदान; वेळ, मतदान प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सर्व माहिती, वाचा एका क्लिकवर

१५ जानेवारी ही सुट्टी

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १५ जानेवारी ही मतदानाच्या दिवशी संबंधित भागात सार्वजनिक सुट्टी असेल. ही सुट्टी सरकारच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये (२४ सार्वजनिक सुट्ट्या) नव्हती, परंतु निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेषतः जाहीर करण्यात आली होती. १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. (Maharashtra Municipal Election 2026)

महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, शैक्षणिक तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या सर्व कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश आस्थापनांना देण्यात आले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल, निवासस्थाने, आयटी कंपन्या, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, किरकोळ विक्रेते आदींना हे आदेश लागू राहणार आहेत. (BMC Election 2026)

कंगाल पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक! अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी ‘या’ देशासोबत JF-17 फायटर जेट्सची अब्जावधींचे डील

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची विशेष सशुल्क सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे. सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

 

Web Title: A public holiday has been declared on january 15th employees in industries establishments and factories will receive paid leave

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 01:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.