Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रभागा नदीपात्र स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2025 | 11:19 AM
चंद्रभागा नदीपात्र स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

चंद्रभागा नदीपात्र स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग, तळ या ठिकाणी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. तसेच या काळात पालखी सोहळ्याव्यतिरिक्त लाखो भाविक पंढरपुरात येतात. अशा सर्व भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पंढरपूर शहरात करण्यात यावी, यासाठी प्रशासनाने तयारी करावी, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोहळा 2025 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्र कायम स्वच्छ राहील यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. तसेच वारीपूर्वी पंढरपूर शहरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. वारकरी भाविकांना उपलब्ध सुविधा तसेच सूचनांची माहिती देण्याचे फलक किमान 15 फूट उंचीचे लावावेत. नदीपात्रातील होड्यांची नोंद घेऊन होडी मालक व चालक यांचे नाव, आसन क्षमता निश्चित करून होडीत जास्त लोक बसणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच होडीमध्ये मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेटची व्यवस्था ठेवली पाहिजे, असेही निर्देश त्यांनी दिले.

तसेच शहरातील पार्किंगच्या ठिकाणी मुरमीकरण व रोलिंग करावे. पालखी मार्ग, तळ तसेच पंढरपूर शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधून संयुक्तपणे कार्यवाही करावी. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पालखी मार्ग तसेच शहरातील रस्त्यावर बंद पडलेली वाहने तात्काळ काढण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावी. वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी, अशाही सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. तसेच या वारी कालावधीत मानाच्या पालख्यासह अन्य पालख्या, दिंड्या, वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी प्रशासन काटेकोरपणे नियोजन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: A separate mechanism will be set up to clean the chandrabhaga river says jaykumar gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Jaykumar Gore
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद
1

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप
2

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप
3

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात
4

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.