Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : नागाव फाटा येथे 16 चाकी मालवाहतूक ट्रक घसरला; महामार्गावरील वाहतूक ठप्प

सांगली फाटा, नागाव फाटा, मयूर फाटा, शिये फाटा, कासारवाडी फाटा या सर्व ठिकाणी उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे वाहतुकीची नेहमी प्रचंड कोंडी निर्माण होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2025 | 12:50 PM
नागाव फाटा येथे मालवाहतूक ट्रक रस्त्यावरून घसरला

नागाव फाटा येथे मालवाहतूक ट्रक रस्त्यावरून घसरला

Follow Us
Close
Follow Us:

शिरोली : पुणे-बंगलूर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे एक अपघात झाला. यात रस्त्याचा अंदाज न आल्याने 16 चाकी मालवाहू ट्रक महामार्गावरून पलटी होऊन सेवा रस्त्यावरील टेम्पोला धडकला. ही घटना बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

सोळा चाकी ट्रक चालक आनंदा महादेव कांबळे (रा.कर्नाटक) हा राजस्थानहून कापडाच्या गाठी भरून तामिळनाडूकडे चालला होता. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास नागाव फाटा येथे आला असता रस्त्याचा अंदाज न आल्याने महामार्गावरून थेट सेवा रस्त्यावर पार्किंग केलेल्या टेम्पोला भरधाव ट्रकची धडक बसली व ट्रक पलटी झाला. यावेळी टेम्पोचालक मुश्ताक अहमद इकबाल पटेल (रा.वड्डी, ता.मिरज, जि. सांगली) हा साखरझोपेत होता. तो गंभीर जखमी झाला आहे. तर १६ चाकी ट्रक पलटी होऊन ट्रकचे व मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हा ट्रक इचलकरंजी येथील असल्याचे समजते.अपघातानंतर तत्काळ ट्रक चालकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी टेम्पो चालकास रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात पाठवले. त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मिरज येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे.

महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू

सध्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. बराचसा भाग सहा पदरीकरण झाला आहे. त्यामुळे वाहतूक सुरू आहे. पण ज्याठिकाणी सहापदरी रस्ता संपून चारपदरी रस्ता पुन्हा सुरू होतो, त्याठिकाणी दिशादर्शक बोर्ड किंवा रेडियम स्टिकर लावणे अपेक्षित आहे. पण अशी कोणतीही खबरदारी या विभागाने घेतली नसल्याने हा अपघात त्याचीच प्रचिती आहे. हा ट्रक सुद्धा सहा पदरी रस्त्यावरून येऊन रस्ता संपल्याचा अंदाज न आल्याने चार पदरी वर न वळता थेट सेवा रस्त्यावर कोसळून उभ्या असलेल्या टेम्पोला धडकला.

पोलिसांचेही नियोजन शून्य

सांगली फाटा, नागाव फाटा, मयूर फाटा, शिये फाटा, कासारवाडी फाटा या सर्व ठिकाणी उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे वाहतुकीची नेहमी प्रचंड कोंडी निर्माण होते. पण ही कोंडी सोडवण्यासाठी शिरोली एमआयडीसी अथवा महामार्ग पोलिस कधीही उपस्थित नसतात हे वास्तव आहे. या समस्येकडे पोलीस प्रशासन व रस्ते विकास अधिकारी गांभीर्याने कधी लक्ष घालणार?, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: A truck carrying goods skidded at nagaon phata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Accident News
  • kolhapur news
  • Truck

संबंधित बातम्या

Kolhapur Accident : ऊसाने भरलेल्या ट्रकची वाहनांना जोरदार धडक; पाचजण गंभीर, वाहतूक ठप्प
1

Kolhapur Accident : ऊसाने भरलेल्या ट्रकची वाहनांना जोरदार धडक; पाचजण गंभीर, वाहतूक ठप्प

‘राज्यात 604 ‘आपला दवाखाना’ सुरू, उर्वरित 96 दवाखाने…’; आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती
2

‘राज्यात 604 ‘आपला दवाखाना’ सुरू, उर्वरित 96 दवाखाने…’; आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी
3

राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी

Kolhapur News : शेतकऱ्यांप्रति सरकार बेजबाबदार ! राजू शेट्टी यांची टीका; देशातील शेती व्यवसायाची अधोगती झाल्याची खंत
4

Kolhapur News : शेतकऱ्यांप्रति सरकार बेजबाबदार ! राजू शेट्टी यांची टीका; देशातील शेती व्यवसायाची अधोगती झाल्याची खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.