Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : “जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार” – मंत्री हसन मुश्रीफ

शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व बांधकामांवर योग्य सनियंत्रण ठेवून विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 14, 2026 | 12:33 PM
Kolhapur News :  “जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार” – मंत्री हसन मुश्रीफ
Follow Us
Close
Follow Us:
  • “जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार”
  • मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती
कोल्हापूर : शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व बांधकामांवर योग्य सनियंत्रण ठेवून विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. यावेळी ते म्हणाले, सर्व कामे विहीत वेळेत पुर्ण झाली तर केवळ कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे तर परिसरातील पाच सहा जिल्ह्यांतील सामान्य रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा मोठा दिलासा मिळणार आहे. शेंडा पार्क येथे जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सर्व प्रकल्पांचा एकत्रित आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून घेण्यात आला.

Kolhapur : भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन! निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी, चक्क 1400 किलोचा रेडा…

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांचा आढावा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कागल तालुक्यातील सांगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, आजरा तालुक्यातील उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालय तसेच महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाच्या नियोजित इमारतीच्या कामांचा सविस्तर आढावा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत घेण्यात आला. कामांबाबत अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे व कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी माहिती दिली.

शेंडा पार्कमधील प्रकल्पांचे आराखडे तातडीने अंतिम करा
बैठकीत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरण कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. मंत्री मुश्रीफ यांनी सर्व कामे मार्च अखेर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या रुग्णालयात अनेक सुविधा अद्ययावत करण्यात आल्या असून, उर्वरित कामे पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय शेंडा पार्क येथील पाणी पुरवठा योजना व मलनिस्सरण प्रकल्पांचे आराखडे तातडीने अंतिम करून आवश्यक प्रक्रिया प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय कामाचा आढावा
सांगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय आणि उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय येथील चालू असलेल्या बांधकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या सर्व कामांना विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी योग्य सनियंत्रण ठेवण्याबाबत बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या. बैठकीला अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, डॉ. अजित लोकरे, डॉ. भूषण मिरजे, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. भाग्यश्री खोत यांच्यासह समाविष्ट आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Kolhapur : वाढीव पाणीबिलाची केली होळी; प्रशासनाचा नोंदवला निषेध, नागरिकांचं आयुक्तांना निवेदन

Web Title: Kolhapur news patients in the district will get state of the art medical facilities minister hasan mushrif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : जोतिबा मंदिरातील ‘पुजारी हटाव’ मागणीसाठी महामोर्चा
1

Kolhapur News : जोतिबा मंदिरातील ‘पुजारी हटाव’ मागणीसाठी महामोर्चा

Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला! कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर; बाहेर पडाल तर घामाघूम व्हाल
2

Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला! कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर; बाहेर पडाल तर घामाघूम व्हाल

Kolhapur News : “येत्या महिनाभरात काम पूर्ण करू!” महापौर रुपाराणी निकम यांचं आश्वासन
3

Kolhapur News : “येत्या महिनाभरात काम पूर्ण करू!” महापौर रुपाराणी निकम यांचं आश्वासन

Sangali News : अनधिकृत बांधकामावर हातोडा; झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई
4

Sangali News : अनधिकृत बांधकामावर हातोडा; झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.