Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन! निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी, चक्क 1400 किलोचा रेडा…

खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 07:22 PM
Kolhapur : भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन! निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी, चक्क 1400 किलोचा रेडा…
Follow Us
Follow Us:
  • भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन!
  • निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. (दि. १३) फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

मेरी वेदर मैदानावर होणाऱ्या अठराव्या कृषी व पशुप्रदर्शनात पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खोंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहे. सांगोला तालुक्यातील दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खाँड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत. तसेच पंढरपुरी मुहा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत. उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांची उपस्थिती असणार आहे.

Satara News : ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर

यावेळी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., आयुक्त के. मंजूलक्ष्मी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष पूर्व राजवर्धन निंबाळकर, विजय पाटील, कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन विजय पाटील, भगिरथी महिला संस्था अध्यक्षा अरुंधती महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शेतीविषयक माहिती
याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रर्शनात आहे. यामध्ये
प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा.लि., कर्नाटका सोप अॅन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा.लि., टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा.लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा.लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत.

दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. यात १३ फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा, १४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

Kolhapur : वाढीव पाणीबिलाची केली होळी; प्रशासनाचा नोंदवला निषेध, नागरिकांचं आयुक्तांना निवेदन

Web Title: Kolhapur inauguration of bhima agriculture and livestock exhibition various animals participated a total of 1400 kg of reda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.