
मुंबई : राज्यातील विविध तुरुंगात हजारो कैदी (Maharashtra Jail) शिक्षा भोगत आहेत. पण या कैद्यांबाबत तुरुंग प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना यापुढे बेड आणि उशी मिळणार आहे. याबाबतची माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी दिली. पण या सुविधेचा लाभ हा फक्त 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना होणार आहे.
तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अमिताभ गुप्ता यांनी बैठक घेतली होती. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी काही कैदी विविध आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली. आजारपणामुळे हे कैदी रात्री नीट झोपूही शकत नाहीत. त्यामुळेच, 50 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना तुरुंगात बेड आणि उशी वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे जरी असले तरी या सर्वाचा खर्च हा स्वत: कैद्याने करायवयाचा आहे. त्यासाठीची साईजही निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती दिली जात आहे.
स्वखर्चाने घ्यावी लागणार सुविधा
तुरुंग प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा हजारो कैद्यांना होणार आहे. पण ही सुविधा 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांना होणार आहे. बेड आणि उशीही दिली जाणार आहे. पण त्यासाठी कैद्यांना पैसे द्यावे लागणार आहे.
आजारी कैद्यांनाही होणार फायदा
तुरुंगात एखादा कैदी अनेक दिवसांपासून आजारी असेल, तुरुंगातील डॉक्टरांनी तसे प्रमाणित केल्यास आणि शिफारीस केल्यास संबंधित कैद्यांनाही बेड आणि उशीचा वापर करण्यास परवानगी दिली जाते.
कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री किंवा चादर
आत्तापर्यंत तुरुंगात अनेक कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री किंवा चादर मिळत होती. मात्र, पोलीस अधिकारी गुप्ता यांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या कैदी परंपरेत बदल केला आहे. या फायदा अनेकांना होणार आहे.