मुंबई – आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aaryan Khan Case) रोज काही ना काही धक्कादायक बाबी समोर येत आहे. या कथित खंडणी कांडात काल समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि समीर वानखेडेची (sameer wankhede) चॅट (whatsapp chat) व्हायरल झाल्यानंतर वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी आता समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशीही सध्या सुरू आहे. या सगळ्या प्रकरणावर अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेच्या ठामपणे उभे राहत होणाऱ्या कारवाईवर भाष्य केलं आहे.
[read_also content=”कर्नाटकचे सिद्धरमय्या सरकार अॅक्शन मोडमध्ये! ‘झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल’ मागे घेण्याचे दिले आदेश, निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता https://www.navarashtra.com/india/zero-traffic-protocol-is-cancel-in-karanataka-fulfillment-of-pre-election-promises-by-cm-siddaramaiah-nrps-402388.html”]
क्रांतीने सोशल मिडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने कोणाचेही नाव न घेता प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती म्हणाली की, ‘मुर्ख बनवण्याच्या दोन पद्धती आहेत, एक जे खरं नाही त्यावर विश्वास ठेवणं आणि दुसरं म्हणजे जे खरं आहे त्यावर विश्वास ठेवण्यास नकार देणं. पुन्हा एकदा ऐका आणि समजून घ्या. जेव्हापासून हे आर्यन खान प्रकरण सुरू झालं आहे तेव्हापासून प्रत्येक वेळी क्रांतीला समाीर वानखेडें यांना साथ देताना, त्यांच्या बाजूने बोलताना पाहण्यात आलं आहे. पतीसाठी ठामपणे उभं राहण्याची क्रांतीची ही काही पहिलीच वेळ नाही.
समीर वानखेडेवर (Sameer Wankhede) आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यन खानला आरोपी न करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे. या आरोपानंतर सीबीायकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. . समीर वानखेडेंची सीबीआयने परवा 5 तास चौकशी केली. त्यानंतर कालही त्यांची चौकशी करण्यात आली. सीबीआयच्या 2 दिवसांच्या तपासानंतर समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी त्यांनी हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे. हल्ल्याची भीती वाटत असल्यामुळे समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षा मागणार आहेत. मला सुरक्षा द्या अन्यथा माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे हल्ला होऊ शकतो. मीडियाच्या रूपाने माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.