Additional Commissioner inspect city for Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Maharaj Ashadhi Wari 2025
पुणे : लवकरच आषाढी वारीचा सोहळा होणार आहे. यासाठी पुण्यासह पालखी मार्गावर जोरदार तयारी केली जात आहे. वैष्णवांच्या या मेळ्यामध्ये लाखो वारकरी अगदी भक्ती भावाने सहभागी होतात. या पायी वारी करणाऱ्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा घेण्यात आला आहे. सर्व संबधित विभागांनी वारी दरम्यान आपापसांत समन्वय राखावा अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिल्या आहेत.