Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे होत असल्याने जागेअभावी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याबाबत संयुक्त पाहणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 24, 2026 | 02:15 PM
Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Follow Us
Follow Us:
  • जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना १५ मे २०२६ ही अंतिम मुदत (डेडलाईन) दिली आहे, जेणेकरून पालखी प्रस्थानापूर्वी सर्व रस्ते आणि सोयी-सुविधा सज्ज असतील.
  • लोणी काळभोर, गवळ्याची उंडवडी, सणसर आणि निमगाव केतकी येथील पालखी मुक्कामाच्या जागेबाबत असलेले वाद किंवा कमतरता प्रशासकीय पातळीवर तातडीने सोडवल्या जातील.
  • देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून (कॅटम मंडळ) आवश्यक ‘नाहरकत प्रमाणपत्र’ (NOC) मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः पाठपुरावा करणार आहेत.
Ashadhi Wari News: आळंदी, आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू व आळंदी पालखी मार्गावरील विविध विकासकामे १५ मे पूर्वी पूर्ण करावीत, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिली. देहू व आळंदी संस्थानांकडून प्राप्त मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनामार्फत ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

देहू ते देहू रोड या पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील तीन किलोमीटर तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दोन किलोमीटरचे काम संबंधित संस्थामार्फत पूर्ण करावे, असे निर्देश दिले. या कामासाठी आवश्यक असलेले देहूरोड कटम मंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले. देहू येथील मंदिरापर्यंतचा सुमारे ५०० मीटर रस्ता नगरोत्थान योजनेतून पूर्ण करणार आहे.

WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप,

संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे होत असल्याने जागेअभावी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याबाबत संयुक्त पाहणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले. काळभोर नगर ते आकुर्डी येथील मेट्रोचे काम पालखीपूर्वी पूर्ण करावे, तसेच लोणी काळभोर येथील पालखी मुक्कामासाठी जागा वाढवून देण्यात येईल. गवळ्याची उंडवडी, सणसर व निमगाव केतकी येथील पालखी मुक्कामाच्या जागेचा प्रश्न प्रशासनामार्फत सोडविण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

आळंदी संस्थानाकडून आलेल्या मागण्यांबाबतही ठोस भूमिका घेत प्रशासनाला मुदत निश्चित करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील संचेतीपासून एफ.सी. रोडपर्यंत रात्री अखंडित प्रकाश व्यवस्था राहील याची खात्री करण्याचे निर्देश दिले. बोरावके मळा ते सासवड दरम्यान नव्याने झालेल्या बायपास मार्गावरील अडथळे दूर करण्यात येतील.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, किरण इंदलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, पालखी मार्गावरील संबंधित विभागांचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, गणेश मोरे, विश्वस्त, संत तुकाराम महाराज संस्थान देहू व योगी निरंगनाथ, विश्वस्त, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी, तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Pawan Hans Helicopter: अवघ्या काही क्षणात होत्याच नव्हत झालं! ७ जणांना घेऊन जाणारे पवन हंस हेलिकॉप्टर

कार्यवाही अधिक वेगाने पूर्ण करा

निरा येथील जुना पूल तात्काळ पाडण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. आळंदी येथील प्रलंबित रस्त्यांची कामे, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्धता तसेच पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीपर्यंतच्या मोठ्या रस्त्यांच्या कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. आळंदी नगरपालिका क्षेत्रातील रस्ते रुंदीकरणाची कार्यवाही अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

  पालखी सोबत क्रेनची व्यवस्था ठेवावी

दिवेघाट येथे आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात येतील. पालखी मार्गावर कोणतीही वाहने बंद पडल्यास वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पालखी सोबत क्रेनची व्यवस्था ठेवण्याची दक्षता प्रशासन व पोलिस विभाग घेतील. परतीच्या वारीदरम्यान आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या बैठकीत आळंदी व देहू संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 

Web Title: District collector orders completion of work on dehu alandi palkhi route by may 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Ashadhi Wari Sohla
  • pune news
  • Saint Tukaram Maharaj Palkhi

संबंधित बातम्या

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा
1

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
2

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
3

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
4

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.