Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेरळ ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी! थकीत घरपट्टी सवलतीचा ठराव फेटाळला

नेरळ ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर पाणीपट्टी ₹१२५ वरून ₹२१० करण्यास मंजुरी मिळाली. त्याचबरोबर, थकीत ₹९० लाखांच्या घरपट्टी वसुलीसाठी सवलत न देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 12, 2025 | 08:09 PM
नेरळ ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी! (Photo Credit - X)

नेरळ ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीला मंजुरी!
  • थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहीम
  • घरपट्टी सवलत न देण्याचा ठराव पास
Neral Gram Panchayat Water Tax Increase:  नेरळ ग्रामपंचायतीच्या (Neral Gram Panchayat) ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर अखेर पाणीपट्टी वाढीला मंजुरी मिळाली आहे. फेब्रुवारी २०२६ पासून नेरळ ग्रामस्थांना नव्या दराने पाणीपट्टी आकारली जाणार आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या घरपट्टी वसुलीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, थकबाकीमध्ये शासनाच्या अध्यादेशानुसार कोणतीही सवलत देऊ नये, असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. प्रशासक सुजित धनगर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली.

₹९० लाखांची थकबाकी: सवलत न देण्याचा निर्णय

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता धारकांकडे तब्बल ९० लाख रुपयांची घरपट्टी थकीत आहे. ग्रामसभेत थकीत घरपट्टी वसुलीबाबत चर्चा झाली. माजी सरपंच सावळाराम जाधव यांनी ठराव मांडला की, थकीत घरपट्टीमध्ये कोणालाही सवलत देऊ नये आणि संपूर्ण थकबाकी वसुलीसाठी ठोस नियोजन जाहीर करावे. शासनाच्या नियमानुसार ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय ग्रामसभा घेऊ शकते, असा नियम असतानाही, ग्रामस्थांनी सवलत देण्यास विरोध दर्शवणारा ठराव बहुमताने हात उंचावून मंजूर केला. दिलीप बोरसे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. जानेवारी २०२६ पासून सर्व थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी संकलनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत हाती घेणार आहे.

हे देखील वाचा: Karjat: आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न; कर्जतमध्ये ‘जातीवाचक शिवीगाळ’ प्रकरणी मोठा तणाव

१२ वर्षांनंतर पाणीपट्टी वाढ, नवीन दर ₹२१०

जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या पाण्याची करवाढ करण्याचा विषय ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी मांडला. बहुसंख्य ग्रामस्थांनी पाणीपट्टी वाढीला विरोध दर्शवला. सूर्यकांत चंचे, सावळाराम जाधव, अक्षय चव्हाण, ॲड. सुमित साबळे यांसह अनेकांनी “आधी दोनवेळ पुरेसे पाणी द्या आणि नंतरच पाणीपट्टी वाढवा,” अशी भूमिका घेतली. वादळी चर्चेनंतर अखेर मासिक पाणीपट्टी ₹२१० करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. नेरळ ग्रामपंचायतीने २०१३ मध्ये मासिक पाणीपट्टी ₹६० वरून ₹१२५ प्रति महिना केली होती. १२ वर्षांनंतर ही पाणीपट्टी वाढविण्यात आली असून, ती फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल. प्रशासक सुजित धनगर यांनी या काळात सर्व थकीत पाणीपट्टी वसुलीचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले.

रेल्वे भुयारी मार्गाचा ठराव मंजूर

या ग्रामसभेत नेरळ गावातून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या पाडा येथील फाटक बंद करण्याच्या रेल्वेच्या निर्णयावर चर्चा झाली. सूर्यकांत चंचे यांनी त्या ठिकाणी भुयारी मार्ग (Subway) बनवण्याचा ठराव मांडला, ज्याला सर्वांनी पाठिंबा दिला.

हे देखील वाचा: Karjat News: कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?

Web Title: After a stormy debate in neral gram sabha water tariff hike approved resolution on house rent relief rejected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • gram panchayat
  • Karjat
  • neral

संबंधित बातम्या

Karjat News: कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?
1

Karjat News: कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा
2

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : गीता जयंतीच्या पावन निमित्त नेरळ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Raigad : गीता जयंतीच्या पावन निमित्त नेरळ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.