आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न
काय घडले नेमके?
आरपीआय आठवले पक्षाचे कार्यकर्ते असलेले राहूल प्रल्हाद डाळींबकर हे तीन डिसेंबर रोजी दुपारी बुध्दनगर येथील घरी जात होते. त्यावेळी तेथील वाचनालय येथे राहणारे त्याच बुद्धनगर भागात राहणारे राकेश अशोक नागदेव हे स्वतःच्या दुचाकीवर बसून मोबाईल वर काही पाहत होते. राहुल डाळींबकर हे तेथे येताच नागदेव यांनी मानेने हातवारे करीत डिवचन्याचा प्रयत्न केला. या घटनेबद्दल कर्जत पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनात डाळिंबकर यांनी नागदेव यांना ‘का रे, काय झाले ?’ असे विचारले त्यावर ‘कुठे काय, जा तू’ असे मला बोलला. यावर मी बोललो कि मी तुझ्याशी पोलाईटली बोलतोय, तू पण माझ्याशी तसेच बोल असे त्यास बोललो. त्यावर तू घरी जा आणि तुझ्या पोरांना विचार असे मला बोलला. त्यावर मी त्याला एकेरी भाषेत बोलू नको, निट बोल असे मी त्याला बोललो आहे असल्याचे लेखी निवेदनात नोंद केले आहे.
हल्ला आणि शिवीगाळ
त्यावेळी राकेश अशोक नागदेव यांनी अचानकपणे माझ्या अंगावर धावून आला आणि मला ‘महार कधीच सुधारणार नाहीत’ असे जातीवाचक अपमानास्पद बोलून त्याच्या हातामध्ये असणा-या लोखंडी कडयाने माझ्या चेह-यावर डाव्या डोळयाच्या खाली मारले व हाताबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी देखील माझा बचाव करण्यासाठी त्यास पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला असता त्याने मला ढकलून दिले त्यामुळे मी खाली पडलो. त्यावेळी त्याने त्याच्या पाठीमागे पॅन्टमध्ये खोचून ठेवलेला चॉपर काढून तो माझ्या अंगावर धावून आला. त्यावेळी मी देखील त्यास मला मार असे म्हटले. त्यावेळी तेथे हजर असणारे सचीन भालेराव आणि इतर यांनी राकेश नागदेव यास पकडले आणि त्यांच्या गाडीवर बसवून त्यास पोलीस ठाणे येथे घेऊन आले.
पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी
त्यामुळे मी देखील पोलीस ठाणे येथे घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी हजर होऊन आपले लेखी म्हणणे मांडले आहे. कर्जत पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार नोंद केली जात असून अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या आधार घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आणि कोणताही तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेला राजकीय किनार
राहुल डाळिंबकर यांच्या सुनबाई या निवडणुकीत प्रभाग पाच मधून महायुतीच्या उमेदवार होत्या, तर राकेश अशोक नागदेव यांनी काल झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे पक्ष यांच्या कर्जत परिवर्तन आघाडीचे काम केले होते. त्यामुळे या भांडणाला राजकीय किनार असून निवडणूक आचारसंहिता स्थगित केली नसल्याने कर्जत पोलिस या गुन्ह्यात रायगड जिल्हाधिकारी जमाव बंदी कायद्याचा वापर करतील अशी शक्यता आहे.






