Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओला-उबरसह सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांनी नोंदणी अनिवार्य; नोंदणी न केल्यास…; बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर सरकारचा कडक इशारा

Pratap Sarnaik: राज्यातील सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांनी १ सप्टेंबरपर्यंत अनिवार्य नोंदणी पूर्ण करावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कडक भूमिका घेतली..

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2026 | 03:00 PM
ओला-उबरसह सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांनी नोंदणी अनिवार्य; नोंदणी न केल्यास...; बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर सरकारचा कडक इशारा

ओला-उबरसह सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांनी नोंदणी अनिवार्य; नोंदणी न केल्यास...; बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर सरकारचा कडक इशारा

Follow Us
Follow Us:
  • ॲग्रीगेटर कंपन्यांनी १ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी
  • अन्यथा कठोर कारवाई
  • बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीला बसणार चाप
मुंबई : राज्यातील ॲग्रीगेटर आधारित प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि नियमबद्ध करण्यासाठी राज्य शासनाने निश्चित केलेल्या ॲग्रीगेटर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात कार्यरत सर्व ॲग्रीगेटर संस्थांनी १ सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी करावी. १ सप्टेंबरनंतर विनानोंदणी अथवा नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲग्रीगेटर संस्थांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिला आहे.

राज्यात ॲपआधारित प्रवासी वाहतुकीचा विस्तार झपाट्याने होत असून लाखो प्रवासी या सेवेचा वापर करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता, सेवा देणाऱ्या वाहनांची वैधता, चालकांची पात्रता आणि ॲग्रीगेटर कंपन्यांची जबाबदारी निश्चित होणे अत्यंत आवश्यक आहे. “तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळाल्याच पाहिजेत; मात्र सुविधेच्या नावाखाली कायद्याला बगल देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ करण्याची मुभा कोणालाही दिली जाणार नाही,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा,जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

राज्याच्या नवीन ॲग्रीगेटर धोरणानुसार संबंधित संस्थांनी परिवहन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. ॲग्रीगेटरशी संलग्न असलेल्या वाहनांकडे वैध परवाना तसेच वैध वाहन नोंदणी असणे बंधनकारक राहील. प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी बाईक, रिक्षा अथवा कॅब ही व्यावसायिक वाहन म्हणून वैध असणे आवश्यक असेल. तसेच वैध ॲग्रीगेटर परवान्याशिवाय खासगी अथवा अन्य वाहनांमधून व्यावसायिक प्रवासी वाहतूक करता येणार नाही.

धोरणानुसार ॲग्रीगेटर पॉलिसी २०२६ अंतर्गत वाहनांसाठी आवश्यक विमा संरक्षण असणेही बंधनकारक राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक ॲग्रीगेटर कंपनीने वाहनातील प्रवासा दरम्यानच्या सुरक्षाविषयक व्यवस्थेची खातरजमा करावी. यासोबतच नियमानुसार उपलब्ध करून द्यावयाच्या सेवांबाबत आवश्यक यंत्रणा तयार करावी, अशा सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत.

“प्रवासी हा या व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्याला सुरक्षित, विश्वासार्ह आणि कायदेशीर सेवा मिळणे हा त्याचा हक्क आहे. ॲग्रीगेटर व्यवसायाला शासनाचा विरोध नाही; मात्र हा व्यवसाय नियमांच्या चौकटीतच झाला पाहिजे. कंपन्यांनी १ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आढळल्यास संबंधित संस्था आणि वाहनांवर कोणतीही हयगय न करता कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

राज्यातील ॲग्रीगेटर प्रवासी वाहतुकीला शिस्त लावतानाच वैध सेवा देणाऱ्या संस्था, चालक आणि प्रवाशांचे हित जपण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे ॲग्रीगेटर कंपन्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे व नियमांची पूर्तता करून नोंदणी करावी, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Web Title: Aggregator companies must register by september 1 or face strict action pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
4

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.