Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: गॅसअभावी सरपणाच्या मागणीत वाढ! बेकरी व्यावसायिक अडचणीत

इस्राएल इराणचा मधील संघर्षाचा फटका महाराष्ट्रातील ग्रामीण भागांना सुद्धा होताना दिसत आहे. ग्रामीण भागात सुद्धा अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 18, 2026 | 09:07 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधनपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसू लागले असून त्याची झळ ग्रामीण भागालाही बसू लागली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी, स्वयंपाकासाठी पर्यायी साधनांचा शोध घेत नागरिक पुन्हा पारंपरिक पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. सोनई परिसरात सध्या सरपणाची मागणी वाढली असून आरा गिरण्यांमध्ये लाकडाच्या सरपणाची विक्री दुप्पट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत नसल्याने अनेक कुटुंबांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. काही नागरिकांनी तर स्वयंपाकासाठी लाकडाच्या सरपणाचा पर्याय स्वीकारला असून त्यामुळे गावातील आरा गिरण्यांमध्ये सरपणासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. सरपणाच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या दरातही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वी मर्यादित प्रमाणात होणारी सरपणाची विक्री आता दररोज होत असल्याने आरा गिरण्यांमध्ये सरपण कापण्याचे कामही वाढले आहे. याचबरोबर हॉटेल, खानावळी तसेच बेकरी व्यवसायिकांनाही गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मोठा फटका बसत आहे.

Ahilyanagar News: महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले 1710 कोटीचे अंदाजपत्रक

अनेक हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून पुन्हा पारंपरिक भट्टया पेटवून लाकडावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर स्वयंपाकासाठी मोठ्या चुली उभारून त्यावर अन्न तयार केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात पूर्वी वापरात असलेल्या या पद्धती पुन्हा एकदा व्यवहारात येताना दिसत आहेत.

शेगड्यांनाही वाढली अचानक मागणी

गॅस टंचाईमुळे शेगड्यांची मागणीही अचानक वाढली आहे. गावातील इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानांमध्ये शेगडी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून अनेक दुकानदारांकडे शेगड्यांचा साठा कमी पडत असल्याचे सांगितले जात आहे. स्वयंपाकाची सोय खंडित होऊ नये यासाठी नागरिकांनी इलेट्रिक शेगडी हा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना या पर्यायी साधनांवरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. जर ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिली, तर ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुलीवरील स्वयंपाकाचे दिवस परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोनईमध्ये सरपणाची मागणी वाढली

स्वयंपाकाची सोय खंडित होऊ नये यासाठी नागरिकांनी इलेट्रिक शेगडी हा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना या पर्यायी साधनांवरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

काही ठिकाणी तर स्वयंपाकासाठी मोठ्या चुली उभारून त्यावर अन्न तयार केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

स्वयंपाकासाठी पर्यायी साधनांचा शोध घेत नागरिक पुन्हा पारंपरिक पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. सोनई परिसरात सध्या सरपणाची मागणी वाढली आहे.

Web Title: Ahilyanagar gas crisis firewood demand rises bakery owners in trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.