Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही

कोपरगावातील रखडलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या कामांबाबत आमदार आमदार आशुतोष काळेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 21, 2026 | 09:03 PM
रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही

रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही

Follow Us
Close
Follow Us:

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या कामांना गती मिळून वाहतुकीसाठी येत असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांच्या समवेत मंगळवार (दि.१७) रोजी दिल्ली येथे जावून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली.

यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघातील रखडलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांची सविस्तर माहिती देवून येणाऱ्या अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नामदार नितीन गडकरी यांनी ही कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत ग्वाही दिली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील पायाभूत सुविधांवर भर देवून मतदार संघात दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते विकासाचे जाळे अधिक भक्कम करण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला असून यामध्ये एन. एच. ७५२ जी सावळीविहीर फाटा ते सेंधवा व एन. एच. १६० सिन्नर ते शिकोडी या दोन राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे.

“कॅप्टन खरातची पाळेमुळे खणू”, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास; भोंदू बाबाचे शिर्डी कनेक्शन समोर

मागण्यांना मिळाला सकारात्मक प्रतिसाद

जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून कोपरगाव मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी केंद्रीय रस्ते निधीतून जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी केली. त्यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोपरगाव मतदारसंघातील रखडलेली रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना गती मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था

या प्रमुख मागण्यांबरोबरच शिर्डीकडे जाणारी बहुतांश अवजड आणि प्रवासी वाहतूक पुणतांबा फाट्‌यावरून झगडे फाटा-वडगावपान मार्गे वळवण्यात आली, सततच्या अवजड वाहतुकीमुळे सदर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे भविष्यात झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याप्रमाणे या रस्त्याचीही अवस्था होवून या रस्त्यावरही अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा (राष्ट्रीय महामार्ग १६० बी) या मागाँचे तातडीने सिमेंट काँक्रीटीकरण करणे गरजेचे असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत हा रस्ता सिमेंट काँक्रीटीचा करण्याची मागणी केली आहे.

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या

उड्डाणपुलाच्या कामासाठी ठेकेदाराला सूचना

यावेळी एन. एच. ७५२ जी राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्यात आले असून या महामार्गावरील पुणतांबा फाटा व बेट नाका येथील उड्डाणपुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एन.एच.१६० या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर फाटा व झगडे फाटा येथील उड्डाण पुलांची कामे व रस्त्यांचे रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली.

Web Title: Ahilyanagar news kopargaon mla ashutosh kale meets union minister nitin gadkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • kopargoan
  • maharashtra news
  • Marathi News
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु
1

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण
2

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात
3

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात

झी झेस्ट अनलिमिट अवॉर्ड्स 2026: फूड आणि लाइफस्टाइल क्षेत्रातील ‘रीडिफायनिंग एक्सीलेंस’ साजरा, दूरदर्शी व्यक्तींना मिळाला सन्मान
4

झी झेस्ट अनलिमिट अवॉर्ड्स 2026: फूड आणि लाइफस्टाइल क्षेत्रातील ‘रीडिफायनिंग एक्सीलेंस’ साजरा, दूरदर्शी व्यक्तींना मिळाला सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.