Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: मालेगावच्या घटनेचे पडसाद अकोलेत; शहरात कडकडीत बंद

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 4 वर्षाच्या चिमुरडीची निर्घृण हत्या करण्यात आली. याच घटनेचा निषेध म्हणून अकोले शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 23, 2025 | 04:08 PM
Ahilyanagar News: मालेगावच्या घटनेचे पडसाद अकोलेत; शहरात कडकडीत बंद

Ahilyanagar News: मालेगावच्या घटनेचे पडसाद अकोलेत; शहरात कडकडीत बंद

Follow Us
Close
Follow Us:
  • मालेगावातील डोंगराळे येथे 4 वर्षाच्या चिमुरडीची निर्घृण हत्या
  • घटनेचा निषेध म्हणून अकोले शहरात कडकडीत बंद
  • मूक मोर्चा देखील काढला
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे साडेतीन ते चार वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून अकोले शहरातील व्यापारपेठ आज बंद ठेवण्यात आली.

अत्याचारग्रस्त बालिकेला श्रद्धांजली आणि आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करत नागरिक, महिला, विविध संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकातून मूक निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देण्यात आले.

Local Body Elections : वडगाव मावळमध्ये प्रचाराचा धुराळा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची खास उपस्थित

मोर्चादरम्यान बालिकेचा फोटो आणि “जाहिर निषेध” लिहिलेली फलकं नागरिकांच्या रोषाला अधोरेखित करत होती. राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून महिला व लहान मुली सुरक्षित नसल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. अशा भयानक गुन्ह्यांसाठी ‘जागेवर फाशीचा’ कायदा केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने आणावा, अशी मागणीही करण्यात आली.

“आपल्या मुलीच्या वयाच्या चिमुरडीवर अत्याचार करताना त्या नराधमाला लाजही वाटली नाही. अशांना पोलिसांकडे न देता जनतेच्या ताब्यात दिले पाहिजे; जनता त्याला दगडाने ठेचून मारील, भर चौकात फाशी देईल,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. “कठोर शिक्षा झाल्यासच अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

Local Body Elections : वडगाव मावळमध्ये प्रचाराचा धुराळा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची खास उपस्थित

या प्रकरणातील आरोपीला भर चौकात फाशी द्यावी, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मोर्चामध्ये अकोले नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, माजी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, माजी सरपंच सुमन जाधव, अभिनेत्री रुचिरा देसाई, राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव मनकर, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सचिन शेटे, विश्व हिंदू परिषदचे राहुल ढोक व सुनील गिते, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, शिवसेना नेते माधवराव तिटमे, मनसे तालुका प्रमुख दत्ता नवले, भाऊसाहेब नाईकवाडी, माकपचे सचिन ताजने, सुवर्णकार समाज संघटनेचे विनायक दैवज्ञ, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेणकर, विखे फाउंडेशनचे निखिल जगताप, महेश माळवे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

मोर्च्यानंतर लहान मुली, महिला आणि इतर प्रतिनिधींच्या वतीने पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Ahilyanagar news malegaon incident impact on akole city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Malegaon

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: कर आकारणीवर निलेश लंके यांचा आक्षेप, थेट मनपा आयुक्तांना पाठवले पत्र
1

Ahilyanagar News: कर आकारणीवर निलेश लंके यांचा आक्षेप, थेट मनपा आयुक्तांना पाठवले पत्र

Ahilyanagar News: अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 146 कोटी रुपये मंजूर! जीवनज्योत फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश
2

Ahilyanagar News: अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 146 कोटी रुपये मंजूर! जीवनज्योत फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश

Ahilyanagar News: महायुतीत बेबनाव तर माविआ काही ठिकाणी भक्कम, सर्वच निवडणुक कार्यालयांमध्ये ‘जत्रा’
3

Ahilyanagar News: महायुतीत बेबनाव तर माविआ काही ठिकाणी भक्कम, सर्वच निवडणुक कार्यालयांमध्ये ‘जत्रा’

मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.